मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

समीर वानखेडेंचा आज NCB ला अलविदा, कार्यकाळात 300 हून अधिक जणांना अटक

समीर वानखेडेंचा आज NCB ला अलविदा, कार्यकाळात 300 हून अधिक जणांना अटकअखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे.

अखेरीस समीर वानखेडे यांची बदली करण्याचा निर्णय एनसीबीने घेतला आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ आज संपत आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 31 डिसेंबर: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यांनी सेवा मुदतवाढ मागितलेली नाही. एनसीबीने ही माहिती दिली. वानखेडे यांना यापूर्वी सप्टेंबरमध्ये चार महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. समीर वानखेडे यांनी मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केल्यानं ते चर्चेत आले. या प्रकरणी बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला 3 ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती. 2008 बॅचचे भारतीय महसूल सेवा (IRS) अधिकारी समीर वानखेडे हे निवृत्त महाराष्ट्र पोलीस अधिकारी ज्ञानदेव वानखेडे यांचे पुत्र आहेत.

मुंबई झोनचे संचालक समीर वानखेडे यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपत असून, ते मुदतवाढ मागणार नसल्याचं निवेदन एनसीबीने जारी केले होते. ऑगस्ट 2020 ते डिसेंबर 2020 पर्यंत त्यांनी 96 जणांना अटक केली आणि 28 गुन्हे दाखल केले. 2021 मध्ये त्यांनी 234 लोकांना अटक केली आणि 117 गुन्हे दाखल केले. एनसीबीने पुढे माहिती दिली की समीर वानखेडेने सुमारे 1000 कोटी रुपयांचे 1791 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज जप्त केले आणि 11 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता गोठवली.

सुशांत सिंह ड्रग्ज प्रकरणी 'गृह मंत्री पदक'ने गौरव

समीर वानखेडे यांनी NCB मध्ये काम करण्यापूर्वी एअर इंटेलिजन्स युनिट (AIU) चे उपायुक्त आणि राष्ट्रीय तपास संस्थेचे (NIA) अतिरिक्त एसपी म्हणून काम केलं. नंतर त्यांची कस्टम्सचे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली आणि मुंबई विमानतळावर त्यांची नियुक्ती झाली. मुंबई एअर इंटेलिजेंस युनिटमध्ये काम करत असताना त्यांनी अनेक सेलिब्रेटींना पकडले जे कस्टम ड्युटी चुकवत होते.

हेही वाचा- लेकाचा अपघातात मृत्यू, वृत्त समजताच आईनंही सोडला जीव, नगरमधील हृदय पिळवटून टाकणारी घटना

ऑगस्ट 2020 मध्ये, सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करण्यासाठी ते एनसीबीमध्ये पोहोचले. प्रकरण स्वत:च्या हातात घेत त्यांनी 33 हून अधिक जणांना अटक केली. 2021 मध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना 'गृह मंत्री पदक' नं सन्मानित करण्यात आलं होतं. अभिनेत्री रिया चक्रवर्तीपासून सुरुवात करून, अनेक हाय-प्रोफाइल बॉलीवूड सेलिब्रिटींची एनसीबीने वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली चौकशी केली आणि त्यांना अटक केली.

बनावट जात प्रमाणपत्र दाखविल्याचा आरोप

या वर्षी ऑक्टोबरमध्ये, समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई किनारपट्टीवरील एका क्रूझ जहाजावर छापा टाकून कथितरित्या ड्रग्ज जप्त केले आणि आर्यन खानसह इतरांना अटक केली. पण नंतर, एनसीबीने छाप्यादरम्यान वापरलेल्या स्वतंत्र साक्षीदारांच्या ओळखपत्रांवर प्रश्न उपस्थित केले गेले आणि अंमली पदार्थ विरोधी एजन्सीच्या अधिका-यांनी शाहरुख खानकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला.

हेही वाचा- वादग्रस्त वक्तव्य करणारे कालीचरण- भय्यू महाराजांचा हा फोटो का होतोय व्हायरल

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते नवाब मलिक यांनीही वानखेडे यांच्यावर आरोप केले. त्यांनी आरोप केला की, हे अधिकारी जन्मतः मुस्लिम आहेत. मात्र नंतर त्यांनी अनुसूचित जाती (एससी) कोट्यात नोकरी मिळवण्यासाठी बनावट प्रमाणपत्रे दाखवली.

First published:

Tags: NCB