Home /News /mumbai /

किशोरी पेडणेकरांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पत्रात अजितदादांचाही उल्लेख

किशोरी पेडणेकरांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पत्रात अजितदादांचाही उल्लेख


किशोरी  पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे.

किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे.

किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे.

    मुंबई, २९ जून : महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) एकीकडे राजकीय नाट्याला नवे वळण मिळाले आहे. महाविकास आघाडी सरकार राहणार की जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या आणि महापौर किशोरीताई पेडणेकर (Kishori Pednekar) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अत्यंत अश्लिल भाषेत हे पत्र लिहून धमकी दिली आहे. किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देणात आली आहे. हे पत्र उरणमधील विजेंद्र म्हात्रे (vijendra mhatre) नावाच्या वकिलाने पाठवले आहे. या वकिलाने याआधीही असंच पत्र पाठवले होते. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यात आली आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या सांगण्यावरूनच सरकार पाडले जात आहे, असा उल्लेख ही विजेंद्र म्हात्रे याने केला आहे. याआधीही वरळी सिलेंडर स्फोट प्रकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपचे आमदार आशिष शेलार यांच्यात वाद पेटला होता. हा वाद सुरू असताना किशोरी पेडणेकर यांना अश्लिल भाषेत पत्र लिहून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकी पत्राबद्दल मुंबई पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. हे पत्र विजेंद्र म्हात्रे या नावाच्या व्यक्तीने हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र उरणमधून पाठवलंय. पोस्टल पनवेलच आहे विजेंद्र म्हात्रे याने हे पत्र लिहिलं असून तो अॅडव्होकेट आहे असे लिहिले, अशी माहिती त्यावेळी खुद्द पेडणेकर यांनी दिली होती. या प्रकरणी पेडणेकर यांनी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्याच वकिलाने पेडणेकर यांना धमकी दिली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या