मुंबई, 8 जुलै : मोदी सरकारच्या (Modi Government) दुसऱ्या टर्ममधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार (Union Cabinet Expansion) करण्यात आला. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात महाराष्ट्रातील चार नेत्यांना संधी देण्यात आली आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजप **(BJP)**वर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात भाजपच्या नेत्यांना वगळून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील चेहऱ्याना अधिक संधी देण्यात आली. याचाच अर्थ भाजपचे नेते मंत्री किती कमकुवत आणि बिनकामाचे आहेत असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार आणि भागवत कराड यांचा समावेश करण्यात आला आहे. शिवसेनेतून काँग्रेस आणि नंतर स्वत:चा स्वाभिमान पक्ष स्थापन केलेल्या नारायण राणे यांनी भाजपत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या भारती पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भाजपत प्रवेश केला होता. तर कपिल पाटील यांनीही राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपत प्रवेश केला आहे. एकूणच केंद्रात मंत्रिपद मिळालेल्या तिघेजण हे इतर पक्षातून भाजपत आले आहेत. यावरुनच जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे. “20 वर्ष झाले सेवेत घेत नाही, आम्हाला आत्महत्येची परवानगी द्या” मानसेवी डॉक्टरांचे मुख्यमंत्र्यांना पत्र नारायण राणेंना टोला नारायण राणे यांच्या कामाची शैली आम्ही जवळून पहिली आहे, ते महाराष्ट्र आणि कोकणसाठी अधिकाधिक सूक्ष्म उद्योग आणतील असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे. तसेच राणेंना भावी वाटचाली बद्दल शुभेच्छा सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे चिडून कारवाई एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीत सन्मानाने प्रवेश दिल्याने चिडून जाऊन भाजप केंद्रीय एजन्सीचा गैरवापर करत चुकीच्या पध्दतीने अडकवत आहेत. मात्र एकनाथ खडसे हे निर्दोष आहेत. त्यांनी चुकीचं काही केलेलं नाही त्यामुळे चौकशीतून ते बाहेर येतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.