जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईत ओसरली कोरोनाची तिसरी लाट? आश्चर्यकारक नवी आकडेवारी समोर

मुंबईत ओसरली कोरोनाची तिसरी लाट? आश्चर्यकारक नवी आकडेवारी समोर

मुंबईत ओसरली कोरोनाची तिसरी लाट? आश्चर्यकारक नवी आकडेवारी समोर

मागील दोन दिवसांमध्ये शहरात पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण हे 30 टक्के ते 20 टक्के कमी झाले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 जानेवारी : मुंबईमध्ये कोरोना (Mumbai Corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली होती. पण आता मुंबईकरांना सलग दुसऱ्या दिवशीही दिलासा मिळाला आहे. आज दुसऱ्यादिवशी कोरोनाबाधित रुग्णांची ( corona patients ) संख्या कमी झाली आहे. आज मुंबईत 11 हजार 647 रुग्ण आढळले आहे. गेल्या पाच दिवसातलीही सर्वात कमी संख्या आहे. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. रुग्णांची संख्याही 25 हजारांच्या पुढे गेली होती. पण, दोन दिवसांपासून रुग्णांची संख्या ही कमी कमी होत चालली आहे. आज मुंबईत ११६४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. ९६६७ रग्णांना लक्षण आढळून आलेली नाहीत. तर रूग्णालयातील १४९८० रूग्ण बरे होऊन घरी परतले आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये कोरोनामुळे २ जणाचा मृत्यू झाला आहे. ( माझी तुझी रेशीमगाठ: सिम्मी आंटीची छोट्या परीने केली हुबेहूब मिमिक्री, video ) मागील दोन दिवसांमध्ये शहरात पॉझिटिव्ह रुग्णाचे प्रमाण हे  30 टक्के ते 20 टक्के कमी झाले आहे. काही दिवसांपासून दर दिवशी 20 ते 25 रुग्ण संख्या आढळून येत होती. तीच संख्या आता 11647 वर येऊन पोहोचली आहे. शहरातील 80 टक्के हॉस्पिटलमधील बेड रिकामे आहे. ( संसर्गापासून असा करा बचाव; WHO ने निरोगी-ठणठणीत राहण्यासाठी सांगितल्या या टिप्स ) तर सोमवारी सुद्धा 13648 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले  होते. 13648 रुग्णांपैकी फक्त 798 रूग्णांना रग्णालयात दाखल करावे लागले होते.  तर त्याआधी सुद्धा रविवारी मुंबईमध्ये दिवसभरात 68 हजार 249 कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यापैकी जवळपास साडे 19 हजार बाधित आढळले होते. कोरोनाबाधितांचा हा वाढता दर 1.66 टक्के इतका होता. तर डब्लिंग रेट हा 41 दिवसांचा आहे. मुंबई शहरातील सध्या रिकव्हरी रेट हा 85 टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात