'एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली आता...;'पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

'एका मंत्र्याच्या राजीनाम्याची पायरी ओलांडली आता...;'पंकजा मुंडेंचा ठाकरे सरकारवर निशाणा

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. त्यांनी ट्वीट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

  • Share this:

मुंबई, 28 फेब्रुवारी : ठाकरे सरकारच्या अडचणी वाढ झाल्याने आज संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा दिला आहे. हे वृत्त समोर येताच विरोधकांनी त्यांच्या कारवाईची मागणी केली आहे. इतकच नाही तर भाजप नेते संजय राठोडनंतर आता धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा राजीनामा घ्या, अशी मागणी करीत आहे. दरम्यान विरोधकांकडून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली जात आहे.

दरम्यान भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनीही ठाकरे सरकारवर तोफ डागली आहे. त्यांनी ट्वीट करुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीट केलं आहे की, एका मंत्र्याच्या राजीनाम्याची एक निर्णयाची पायरी उशिराने का होईना ओलांडली आता निष्पक्षपातीपणे चौकशीचा डोंगर सरकारला ओलांडायचा आहे. सरकारच्या इतिहासात महिलांच्या बद्दल एवढा दुजाभाव आणि सामाजिक व्यवस्थेची इतकी दुरवस्था आपल्या महाराष्ट्राला शोभणारी नाही.

हे ही वाचा-संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची रोखठोक प्रतिक्रिया

राज्यभर पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकीय गदारोळ सुरू आहे. या प्रकरणात शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वांसमोर येत सरकारची भूमिका आक्रमक शब्दांमध्ये जाहीर केली. या प्रकरणी विरोधी पक्ष गलिच्छ राजकारण करत असून पूजा चव्हाण हिचे आई-वडील आपल्याला भेटले असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या भेटीत त्यांनी माझ्याकडे एक पत्र दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या पत्रात पूजाच्या आई-वडिलांनी घेतलेल्या भूमिकेची आता सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: February 28, 2021, 8:56 PM IST

ताज्या बातम्या