Home /News /mumbai /

पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उलगडलं; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

पालघरमधील नौदल अधिकाऱ्याच्या मृत्यूचं गूढ उलगडलं; पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

भारतीय नौदलातील एका अधिकार्‍याचा पालघर जिल्ह्यातील वेवजी तलासरी येथे संशयास्पद मृत्यू झाला होता.

पालघर, 24 फेब्रुवारी : भारतीय नौदलातील एका अधिकार्‍याचा पालघर जिल्ह्यातील वेवजी तलासरी येथे संशयास्पद मृत्यू झाला होता. हे सर्व प्रकरण खंडणीचे नसून आर्थिक त्रासातून आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर या प्रकरणात पोलिसांच्या हाती मोठी माहिती लागली आहे. 5 फेब्रुवारी रोजी सुमारे 90 टक्के भाजलेल्या अवस्थेत सुरज कुमार दुबे या नौदलातील अधिकाऱ्याने आपल्याला खंडणीसाठी अपहरण करून मारून टाकण्याचा प्रयत्न केल्याचा मृत्यू पूर्वी घोलवड पोलिसांकडे जबाब दिला होता. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले होते. याप्रकरणी पालघर पोलिसांनी डहाणूचे उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली दहा पथके तयार करून विविध ठिकाणी तपास केला. (The mystery of the death of a naval officer in Palghar was revealed) या फिर्यादेत 30 जानेवारी रोजी चेन्नई विमानतळाच्या बाहेरहून आपले अज्ञात इसमाने अपहरण केल्याचे म्हटले होते. मात्र चेन्नई विमानतळ तसेच विमानतळाजवळ असलेल्या एका हॉटेलमधील व एका बस स्टॅन्ड येथील सीसीटीव्ही फुटेज पाहता मृत अधिकारी मुक्तपणे वावरत असल्याचे पुरावे प्राप्त झाल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रेय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. शेअर्समुळे मोठं नुकसान त्याचप्रमाणे 30 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान या नौदल अधिकाऱ्याने चेन्नई-वेल्लोर दरम्यान प्रवास करून वेल्लोर येथील काही हॉटेलमध्ये एकट्याने अधिवास केल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. त्याचप्रमाणे एकट्याने एटीएम मधून पैसे काढल्याचे देखील पोलिसांकडे पुरावे आहेत. शेअर बाजारांमध्ये सुमारे पावणे अठरा लाख रुपयांची गुंतवणूक केलेला हा अधिकारी शेअर व्यवहारात पूर्णपणे बुडून गेला होता. त्याच्यावर 76 हजार रुपयांची देणी असून त्यांनी आपल्या नातेवाईक, मित्र परिवार तसेच लग्न ठरल्यानंतर सासऱ्या कडून मोठ्या रकमेची कर्ज घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. अधिकारी शेअर बाजारात गुंतवणूक करीत आहे वा कर्जबाजारी झाल्याचं कुटुंबीयांना माहिती नसल्याचं पोलीस तपासात पुढे आले आहे. हे ही वाचा-10 वर्षांचा मुलगा परदेशातून आला म्हणून वडिलांना 2.45 लाखांचा क्वारंटाइन भुर्दंड तपासातून धक्कादायक बाब समोर मृत अधिकाऱ्याने आपल्या फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे 4 फेब्रुवारीच्या रात्री एका वाहनातून आपल्याला चेन्नईहून तलासरी येथे आणण्यात आले असे नमूद केले असले तरी 1500 किलोमीटरचा प्रवास करण्यास किमान 25 ते 26 तास लागत असल्याने जबाबत नमूद केलेले बाबी व प्रत्यक्ष तपासामध्ये पुढे आलेली माहिती यामध्ये मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. महिना भराच्या सुट्टीसाठी आलेल्या या अधिकाऱ्याने 13 बँकांमधून मोठ्या रक्कमेच्या कर्जासाठी चौकशी केल्याचे 'सिबिल' कडून माहिती प्राप्त झाली आहे. शेअर बाजारात झालेला तोटा व आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याच्या दिशने तपासाची दिशा सरकली आहे. तलासरी नाक्यावर असलेल्या पेट्रोल पंपावरून 5 फेब्रुवारीच्या पहाटे एक व्यक्ती दोन प्लास्टिक बॉटलमध्ये डिझेल घेतल्याची चित्रफित पोलिसांना प्राप्त झाली असून त्याची प्रतिमा मृत अधिकाऱ्याशी साधर्म्य आहे. त्यामुळे खंडणी व अपहरणाच्या दिशेने सुरू असलेला पोलीस तपास आत्महत्येकडे वळल्याचे प्राथमिक निष्कर्षातून पुढे आल्याचे पालघर पोलिसांनी पत्रकारांना सांगितले.
Published by:Meenal Gangurde
First published:

Tags: Palghar, Suicide

पुढील बातम्या