Home /News /lifestyle /

10 वर्षांचा मुलगा परदेशातून आला म्हणून वडिलांना सोसावा लागला 2.45 लाखांचा क्वारंटाइन भुर्दंड

10 वर्षांचा मुलगा परदेशातून आला म्हणून वडिलांना सोसावा लागला 2.45 लाखांचा क्वारंटाइन भुर्दंड

वेगवेगळ्या देशात क्वारंटाइनचे नियम कडक केले आहेत. प्रसार टाळण्यासाठी या उपाययोजना, नियम आवश्यकच असले, तरी त्यामुळे अनेक ठिकाणी विचित्र प्रसंगही ओढवत आहेत.

लंडन, 24 फेब्रुवारी : कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona) आटोक्यात येऊ लागला आहे, असं वाटत असतानाच त्याचा प्रसार पुन्हा काही ठिकाणी वेगाने होऊ लागल्यामुळे सगळीकडेच सतर्कता बाळगली जात आहे. प्रसार टाळण्यासाठी उपाययोजना, नियम आवश्यकच असले, तरी त्यामुळे अनेक ठिकाणी विचित्र प्रसंगही ओढवत आहेत. वेगवेगळ्या देशात क्वारंटाइनचे नियम कडक केले आहेत. पण यातून काही जणांना निष्कारण क्वारंटाइन भुर्दंड सोसावा लागत आहे. असाच एक प्रसंग नुकताच स्कॉटलंडची (Scotland) राजधानी एडिंबरामध्ये (Edinburgh) घडला आहे. UK अर्थात ब्रिटनमध्ये परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत अत्यंत कडक नियम करण्यात आले आहेत. त्यातच फिनलंडमध्ये नव्या स्ट्रेनचा व्हायरस (New strain of coronavirus finland) सापडल्याने तिथून प्रवास करून येणाऱ्यांसाठी तर  संस्थात्मक विलगीकरण (institutional quarantine) बंधनकारक आहे. त्याचा त्रास एका 10 वर्षांच्या मुलाच्या वडिलांना झाला. हे वाचा - महाराष्ट्रातील कोरोनाला आवरण्यासाठी मोदी सरकारची धडपड; मदतीला केंद्रीय समिती अँतोनियो कॅराबॅलो (44) एका तेल कंपनीसाठी स्कॉटलंडमध्ये काम करतात. त्यांचा 10 वर्षांचा मुलगा त्याच्या आईबरोबर फिनलंडमध्ये (Finland) राहतो. सामी असं त्याचं नाव. त्याचा वाढदिवस ऑक्टोबर महिन्यात झाला, तेव्हा त्याचे वडील (अँतोनियो) त्याला भेटले होते. त्यानंतर त्यांची भेट झाली नव्हती. म्हणून तो त्यांना भेटायला एकट्यानेच विमानातून प्रवास करून एडिंबराला आला. तो लहान असल्यामुळे त्याला त्याच्या वडिलांच्या घरी क्वारंटाइन (Quarantine) केलं जाईल, असा त्यांचा होरा होता; प्रत्यक्षात मात्र स्कॉटलंडच्या कठोर नियमांमुळे त्यांना क्वारंटाइनसाठी ठेवलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये जावं लागलं आहे. 2400 पौंड रुपये म्हणजे जवळपास पावणेतीन लाख रुपये भरून अँतोनियो आणि सामी क्वारंटाइन झाले आहेत. सामीच्या दोन आठवड्यांच्या ट्रिपपैकी 11 दिवस क्वारंटाइनमध्येच जाणार आहेत. रोज त्यांना फक्त 15 मिनिटं कार पार्किंगच्या भागात बाहेर पडायला देण्यात येतं. हे नियम अत्यंत विचित्र कडक असून, प्रशासनाशी संपर्क साधण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा केल्याचं अँतोनियो यांनी सांगितलं. वडिलांना इतके दिवस न भेटल्याने सामी आधीच मानसिक ताणात आहे. त्यात आता ही परिस्थिती उद्भवली आहे. ब्रिटनमधल्या मजूर पक्षाच्या खासदारांनीही ही अत्यंत उद्वेगजनक परिस्थिती असल्याचं म्हटलं आहे. क्वारंटाइन धोरण आणि निर्बंध ठरवताना त्यात नेमकेपणा असायला हवा, असं त्या पक्षाचं म्हणणं आहे. सरकारच्या प्रवक्त्याने मात्र ही परिस्थिती वाईट असली, तरी कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेन्स देशात न येण्यासाठी आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. पाहा - नव्या स्ट्रेनपासून बचाव करण्यासाठी असा वापरा मास्क; तज्ज्ञांनी सांगितली युक्ती दरम्यान, स्कॉटलंडचं हे धोरण कडक असलं, तरी त्यातही काही कच्चे दुवे आहेत. इंग्लंड, आयर्लंड, आइल ऑफ मान आणि चॅनेल आयलंडस् येथून स्कॉटलंडमध्ये येणाऱ्यांना क्वारंटाइनची गरज नाहीये. तसंच, फिनलंड हा देश इंग्लंडच्या (England) रेड-लिस्टमध्ये (Red List) नाहीये. त्यामुळे फिनलंडमधून इंग्लंडमध्ये आलेल्या प्रवाशांनी पैसे भरून कोरोना चाचणी केली आणि ती निगेटिव्ह आली तर क्वारंटाइन व्हावं लागत नाही. त्यामुळे फिनलंडमधून इंग्लंडमध्ये येऊन तिथून स्कॉटलंडमध्ये आल्यास सामीला क्वारंटाइन व्हावं लागलं नसतं.
First published:

Tags: Coronavirus, Home quarantine, United kingdom

पुढील बातम्या