VIDEO : डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी, पोलिसाला बेदम मारहाण

VIDEO : डोंबिवलीत पार्किंगच्या वादातून तुफान हाणामारी, पोलिसाला बेदम मारहाण

यावेळी रिक्षाचालक आणि पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली

  • Share this:

डोंबिवली, 17 फेब्रुवारी : पार्किंगच्या शुल्लक कारणावरुन डोंबिवलीत एक रिक्षाचालक व पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ते दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री ही घटना घडली. त्यानंतर आलेल्या सीसीटीव्ही फूटेजच्या माध्यमातून आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. डोंबिवलीच्या पाथर्ली परिसरात ही घटना घडली. या भागात राहणारे रिक्षाचालक नितेश चाफळे हे मित्रांना घेऊन हॉटेलमध्ये जेवायला चालले होते. हॉटेलसमोर रिक्षा लावताना त्यांचा एका बाईकस्वाराशी वाद झाला. या वादातून बाईकस्वाराने त्याच्या मित्रांना बोलावून घेतले आणि रिक्षाचालक नितेश चाफळे याला बेदम मारहाण केली. या बाईकस्वार व त्याच्या मित्रांनी नितेश चाफळे यांच्या मांडीवर चाकूने सपासप वार केले. यावेळी त्याला वाचविण्यासाठी आलेले हॉटेल कर्मचारी आणि पोलीस असलेल्या दोन मित्रांनाही मारहाण करण्यात आली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला, तरी अद्याप कुणालाही अटक केलेली नाही.

ही घटना रात्रीच्या वेळी घडली. त्यावेळी रविवार असल्याचे बऱ्यापैकी गजबज होती. बाईकस्वाराने त्याच्या मित्राना बोलावले तेव्हा त्यांनी स्वत:सोबत धारदार शस्त्र आणल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नितेश चाफळे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. पोलीस असलेल्या त्यांचे मित्रही मारहाणीत जखमी झाले आहे. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे.

अन्य बातम्या

डोनाल्ड ट्रम्प येणार म्हणून गुजरातमध्ये तयारी; नीलगाय, कुत्र्यांना करणार गायब

अस्थी विसर्जन केल्यानंतर कुटुंबावर काळाचा घाला; भीषण अपघातात 7 जण ठार, 14 जखमी

First published: February 17, 2020, 8:30 AM IST

ताज्या बातम्या