Union
Budget 2023

Highlights

मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

BREAKING : काही वेळात मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात करणार दाखल, शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

BREAKING : काही वेळात मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात करणार दाखल, शस्त्रक्रिया होण्याची शक्यता

एकीकडे राज्यभरात ST कर्मचारांचं आंदोलन चिघळलं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांचा त्रास वाढल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

मुंबई, 10 नोव्हेंबर : एकीकडे राज्यभरात ST कर्मचारांचं आंदोलन चिघळलं असताना दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांचा त्रास वाढल्याने आजच त्यांना रिलायन्स उद्योग समुहाच्या हरकिसनदास सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये (Reliance Harkishandas Superspeciality Hospital) दाखल करण्यात येणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. गिरगावातील या रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना पाठीचा त्रास सुरू होता. त्यातून बरे झाल्यानंतर त्यांना पुन्हा मानेचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे आज कॅबिनेटच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे. कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्र्यांनी आपल्या आरोग्याबाबतची माहिती दिली.

हे ही वाचा-BREAKING : संपकरी एसटी बस कर्मचाऱ्यांवर अखेर कारवाई, 376 जण निलंबित

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) यांना पाठीचा आणि मानदुखीचा त्रास होत आहे. सध्या त्यांच्यावर घरीच उपचार सुरू आहे. पण, आता त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया (Spine surgery) करण्याची शक्यता आहे.  प्रख्यात स्पाईन सर्जन शेखर भोजराज शस्रक्रिया करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज त्यांची तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रियेबद्दल निर्णय घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मानेजवळील स्नायू दुखावले गेले असून सोमवारी केलेल्या तपासणीत हे स्पष्ट झालं. सुरुवातीला घरीच त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते. पण, तपासणी केली असता डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. अखेर, मुख्यमंत्र्यांनी शस्त्रक्रिया करण्यास होकार दर्शवला आहे.

First published:

Tags: Udhav thackarey