मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आजच मंत्रिमंडळ विस्तारावर होणार शिक्कामोर्तब? मुख्यमंत्री घेणार अमित शहांची भेट

आजच मंत्रिमंडळ विस्तारावर होणार शिक्कामोर्तब? मुख्यमंत्री घेणार अमित शहांची भेट

कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार?

कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार?

कोणाला कोणतं मंत्रिपद मिळणार?

  • Published by:  Meenal Gangurde
मुंबई, 8 जुलै : सत्ता स्थापन केल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Eknath Shinde and Deputy Chief Minister Devendra Fadnavis) हे मंत्रिमंडळ विस्ताराची तयारी करीत आहे. मंत्रिपदाचं वाटप हे दिल्लीतील पक्षश्रेष्ठींच्या देखरेखीखाली होणार असल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister will meet Amit Shah today) दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. मुख्यमंत्री आजच अमित शहा यांना भेटणार आहेत. आज रात्री साधारण 8.30 वाजता शिंदे हे अमित शाह यांची भेट घेतील. यासाठी मुख्यमंत्री शिंदे रात्री 7.40 वाजता दिल्लीत दाखल होणार आहेत. आज अमित शहांची भेट घेतल्यानंतर उद्या पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. उद्या संध्याकाळी 4.30 वाजता मुख्यमंत्री शिंदे हे पंतप्रधान मोदींना भेटणार असल्याची माहिती सूत्रांच्या हाती लागली आहे. दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडूनही आपला पक्ष वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान आज उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका मांडली. कितीही झालं तरी मागे हटनार नसल्याचा त्यांचा दृढ निश्चय आहे. उद्धव ठाकरेंनी मांडली आपली भूमिका 'शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा इशारा ठाकरे यांनी शिंदे गटाला दिला आहे. सगळे आमदार गेले, तरी पक्ष अस्तित्वात असतो. तुम्ही भ्रमाच्या भोपळ्यात अडकू नका. जे 15-16 आमदार माझ्याबरोबर राहिलेत त्यांचं जाहीर कौतुक करायचंय. अशी जिगरीची माणसं असतात, तिथे विजय होतोच. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. येत्या 12 तारखेला सुनावणीचा निकाल येईल तो शिवसेनेच्या भविष्याचा निकाल नसेल. पण या केसमुळे देशात लोकशाहीचं भविष्य किती काळ मजबूत राहणार आहे. आंबेडकरांच्या घटनेनुसार कारभार होणार आहे का हे सांगणारा हा निकाल असेल. देशाच्या लोकशाहीची वाटचालीची दिशा दाखवणारा निकाल ठरेल.' असे ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
First published:

Tags: Amit Shah, Delhi, Eknath Shinde

पुढील बातम्या