मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत पुन्हा खळबळ, नाल्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

मुंबईत पुन्हा खळबळ, नाल्यात आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच आता पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Body found in the lake)) आढळून आला आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच आता पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Body found in the lake)) आढळून आला आहे.

कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच आता पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Body found in the lake)) आढळून आला आहे.

मुंबई, 16 मार्च : मुंबईमध्ये (Mumbai) गेल्या काही दिवसांपासून घडत असलेल्या घडामोडींमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न चर्चेत आला असतानाच आता पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीचा मृतदेह (Body found in the lake) आढळून आला आहे. विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर परिसरातील एका नाल्यात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

विक्रोळी पूर्व येथील टागोरनगर ग्रुप नंबर 3 येथील नाल्यात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह नागरिकांना आढळला. या मृतदेहाची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढला असून राजावाडी रुग्णालयात पुढील प्रक्रियेसाठी पाठवण्यात आला आहे.

विक्रोळी पोलीस ठाणे या प्रकरणी पुढील तपास करत आहेत. विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आढळलेल्या हा मृतदेह पुरुषाचा असून अंगावर निळा शर्ट आणि जीन्स पॅन्ट घातलेली दिसत आहे. तसंच बॉडी कंपोज झालेली आहे. वय अंदाजे 40 ते 45 असून सदरची बॉडी येथून राजेवाडी हॉस्पिटल घाटकोपर या ठिकाणी नेण्यात आली आहे.

हेही वाचा - पर्यटनासाठी गेलेल्या दोन मित्रांवर काळाचा घाला; पवना नदीत बुडून मृत्यू

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून मुंबईत घडत असलेल्या गुन्ह्यांच्या घटना पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरत आहेत. अशातच आणखी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने हा व्यक्ती नक्की कोण आहे, त्याचा मृतदेह नाल्यात कसा गेला, त्याचा खून झाली की आत्महत्या, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचं आव्हान पोलिसांसमोर उभं ठाकलं आहे.

पोलीस तपासानंतर याप्रकरणी नक्की काय खुलासा होतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news, Dead body, Death, Maharashtra, Mumbai, Mumbai police