मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /संपकरी ST कर्मचाऱ्यांना दणका, कारवाई मागे होणार नाही, परबांचं स्पष्ट उत्तर

संपकरी ST कर्मचाऱ्यांना दणका, कारवाई मागे होणार नाही, परबांचं स्पष्ट उत्तर

हिवाळी अधिवेशनामध्ये आज अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ कारवाईबाबत माहिती दिली.

हिवाळी अधिवेशनामध्ये आज अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ कारवाईबाबत माहिती दिली.

हिवाळी अधिवेशनामध्ये आज अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ कारवाईबाबत माहिती दिली.

मुंबई, 27 डिसेंबर : एसटी महामंडळ (st bus) राज्य सरकारमध्ये (mva government) विलीनीकरण करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या दोन महिन्यांपासून कर्मचारी आपल्या (st bus strike) संपावर आहे. राज्य सरकारने संपकरी कर्मचाऱ्यांवर बडतर्फ करण्याची कारवाई केली आहे. ज्या संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, ती मागे घेतली जाणार नाही, असं स्पष्टीकरण परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) यांनी दिली.

विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आज अनिल परब  यांनी एसटी कर्मचारी बडतर्फ कारवाई यांच्या विषयी माहिती दिली. यावेळी  'जे एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत. त्यांच्यावरील बडतर्फ कारवाई मागे घेणार नाही, असं स्पष्ट उत्तर एसटी कर्मचाऱ्यांविषयी शशिकांत शिंदे यांना उत्तर देताना अनिल परब यांनी दिले. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती, ती आता मागे घेतली जाणार नाही.

मागील आठवड्यातच अर्थमंत्री अजित पवार यांनीही एसटी महामंडळ विलीनीकरणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली होती. प्रत्येकाने विलीनीकरणाचा हट्ट केला तर हे शक्य नाही. पगारवाढ झाली पाहिजे हे नक्की. पगाराची हमी आम्ही घेतली आहे. 10 तारखेच्या आत पगार मिळणार आहे. कॉलेज सुरू झालंय, विद्यार्थ्यांची अडचण होत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामावर परत यावे, असं म्हणत अजित पवार यांनी विलीनीकरणाच्या मागणीला स्पष्टपणे नकार दिला.

एसटी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या सत्र सुरूच

दरम्यान, संपकरी कर्मचाऱ्यांचे आत्महत्या (ST employee commits suicide)  सत्र सुरूच आहे. नांदेडमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्याने केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. नांदेडमध्ये एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आहे. भिमराव सदावर्ते (वय 57) असं या आत्महत्या करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे. सदावर्ते यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. भीमराव सदावर्ते हे नांदेडमधील किनवट आगारात वाहक पदावर कार्यरत होते. गेल्या दोन महिन्यांपासून ते एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात सहभागी होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

First published: