Home /News /mumbai /

'रावणाच्या मंत्रिमंडळाला लाजवेल असं ठाकरेंचं स्वैराचारी मंत्रिमंडळ'; मुख्यमंत्री भाजपच्या रडारवर

'रावणाच्या मंत्रिमंडळाला लाजवेल असं ठाकरेंचं स्वैराचारी मंत्रिमंडळ'; मुख्यमंत्री भाजपच्या रडारवर

दिवसेंदिवस ठाकरे सरकारचं टेन्शन वाढतच आहे

    मुंबई, 14 फेब्रुवारी : विविध मुद्द्यांवरुन ठाकरे सरकारवर घेराव घातला जात आहे. काल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी साधुंबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. यानंतर हा मुद्दा चिघळला असून भाजपकडून ठाकरे सरकारविरोधात घणाघात केला जात आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. अलीकडचे साधू हे मनोरुग्ण आहेत, व साधुंसारखे नालायक लोक जगात भेटणार नाही; असं धक्कादायक वक्तव्य काँग्रेस मंत्री विजय वडेट्टीवारांनी केलं आहे. पुढे ते म्हणाले की, महाराष्ट्राला संतांची संस्कृती लाभलेली आहे. महाराष्ट्र संतांच्या शिकवणीवर उभा राहिला. संत व साधू हे वेगवेगळे आहे. संत हे समाजासाठी समर्पित आहे. संत हा समाजाचा दिशादर्शक आहे पण हे साधू लुबाडणारे असतात. साधू संपत्ती उभारणारे असतात. त्या माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे. ज्याला जी टीका करायची असेल करा, असं थेट इशारा वडेट्टीवारांनी दिला आहे. ओबीसी समाजाने साधूंच्या मागे लागू नये, असेही ते म्हणाले. हे ही वाचा-व्यक्ती कितीही मोठी असू द्या...जबाबदार असेल तर कारवाई झालीच पाहिजे' वडेट्टीवार यांच्या वक्तव्यानंतर भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक आचार्य तुषार भोसले यांनी पत्रकार परिषद घेत घणाघात घातला आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, 'महाराष्ट्राचे मनोरुग्ण मंत्री म्हणतात की, साधू नालायक आहे. पण माझा प्रश्न उद्धव ठाकरेंना आहे. हे दिवस हिंदुत्वाला तुम्ही दाखवणार आहात का? हिंदू धर्माचा अपमान तुमचे मंत्री करीत असतील तर आम्ही ते सहन करायचं का? शर्जिलसारखी विकृती हिंदू संस्कृतीविषयी अपशब्दाचा वापर करते.' ठाकरे सरकार व विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात उद्या साधू संताचा शंखनादाची घोषणा तुषार भोसले यांनी केली आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    पुढील बातम्या