मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /सुशांतच्या एका बहिणीला कोर्टाचा दिलासा, तर एकीवर गुन्हा कायम

सुशांतच्या एका बहिणीला कोर्टाचा दिलासा, तर एकीवर गुन्हा कायम

 सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कायद्यानं बंदी असलेली औषधं गैरमार्गानं दिल्याचा बहिणींवर आरोप करण्यात आला होता.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कायद्यानं बंदी असलेली औषधं गैरमार्गानं दिल्याचा बहिणींवर आरोप करण्यात आला होता.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कायद्यानं बंदी असलेली औषधं गैरमार्गानं दिल्याचा बहिणींवर आरोप करण्यात आला होता.

मुंबई, 15 फेब्रुवारी : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या  (Sushant Singh Rajput) प्रकरणी बहिणी मीतू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्याविरुद्ध याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली आहे.  हायकोर्टाने एका बहिणीला दिलासा दिला आहे, तर एका बहिणीला झटका दिला आहे. प्रियांका सिंहविरोधातील गुन्हा रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी कायद्यानं बंदी असलेली औषधं गैरमार्गानं दिल्याचा बहिणींवर आरोप करण्यात आला होता. याबद्दल रिया चक्रवर्तीच्या तक्रारीवरून सुशांतच्या बहिणींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आज मुंबई हायकोर्टामध्ये या प्रकरणी सुनावणी झाली.

यावेळी मुंबई पोलिसांनी मीतू सिंहविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा हायकोर्टाकडून रद्द करण्यात आला आहे. पण याच प्रकरणात एका बहिणीला दिलासा देण्यास हायकोर्टाचा नकार दिला आहे.  प्रियांका सिंह यांच्यावर असलेला गुन्हा कायम असणार आहे.

त्यामुळे प्रियंका सिंह विरोधातील निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे, अशी माहिती सुशांतच्या बहिणीच्या वकिलांनी हायकोर्टात दिली,

सुशांतच्या बहिणींवर कोणता आरोप?

रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीने तक्रार केली आहे की, सुशांतच्या बहिणीने दिल्लीच्या एका डॉक्टरकडून बोगस प्रिस्क्रिप्शन सुशांतसाठी पाठवलं होतं. सुशांतच्या मन:शांतीसाठी ही औषधं पाठवली आहेत अशी बतावणी करुन काही औषधं पाठवण्यात आली होती. पण या औषधांमुळे सुशांतची मानसिक अवस्था बिघडली, असा आरोप रियाने केला आहे. ही औषधं घेतल्यामुळेच सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख आहे.

First published:

Tags: Mitu singh, Priyanka singh, Star celebraties, Sushant Singh Rajput, Sushant singh rajput case, Sushant singh sisters