मुंबई, 28 ऑगस्ट : अंतिम वर्षांच्या परीक्षा रद्द न करता त्या होणारच मात्र त्यासंदर्भात तारखा ठरवण्याचे निर्देश प्रत्येक राज्यांना असतील. UGC ने दिलेल्या तारखांना परीक्षा घेता येणार नसतील तर नवीन तारखा UGC सोबत चर्चा करून ठरवण्यात याव्यात आणि जाहीर कराव्यात असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. यावर पुन्हा एकदा विरोधीपक्ष असलेल्या भाजपने ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे. भाजप आमदार ॲड. आशिष शेलार यांनी ट्वीट करून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ‘शिक्षण तज्ज्ञ, कुलगुरू यांची मत धुडकावून लावली आणि “बबड्याच्या” हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला. आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण अहंकार…! ऐकतो कोण? पाडून दाखवा सरकार स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले’, शिवाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाच्या खोळंबा केल्याची जहरी टीकाही शेलार यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील "पाडून दाखवा सरकारने"
— Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) August 28, 2020
स्वतःच्या अहंकारातून
स्वतःच
तोंडावर पडून दाखवले!
पण...
विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका... परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल...तुमचे भविष्य उज्वलच आहे!!
(3/3)
हे वाचा- पतंजलीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा, ‘कोरोनिल’बाबत घेतला मोठा निर्णय अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टानं नुकताच निर्णय दिला आहे. परीक्षा रद्द न होता त्या घेण्याचा निर्देश देण्यात आले आहेत. UGC नं दिलेल्या गाईडलाइन्स योग्य असल्यानं अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार मात्र त्या UGCनं दिलेल्या तारखांना घेण्याबाबत प्रत्येक राज्यांना स्वातंत्र आहे. नवीन तारखा अथवा परीक्षा कोरोनामुळे पुढे ढकलायच्या असल्यास UGC सोबत चर्चा करून नवीन तारखा जाहीर करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आले आहेत. कोरोनामुळे बोर्डाचे काही पेपर रद्द करण्यात आले होते. तर jee आणि NEET परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात होती. मात्र JEE आणि नीट परीक्षाही ठरलेल्या तारखेनुसार होणार आहे. कोरोनामुळे रखडलेल्या अंतिम वर्षाच्या परीक्षाही घेण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

)







