12 आॅगस्ट : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पाठराखण केलीय. सुभाष देसाई हे चांगलं काम करत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.
इगतपुरी एमआयडीसी जमीन हस्तांतर घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा फेटाळलाय.
या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांनी देसाईंची भक्कम पाठराखण केली. देसाईंनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्यानेच मी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे पाठवलं होतं. मात्र माझ्या आणि मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा फेटाळण्याचा निर्णय घेतला असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
तसंच देसाई यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनीच अनेक गंभीर घोटाळे केले आहे. त्यामुळे त्यांचीच चौकशी करण्याची खरी गरज असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी केला.
First published:
top videos
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.