सामान्यातला हिरो! दोन्ही मुलांना गमावल्यानंतर 7 जणांची घेतली जबाबदारी; मुंबईच्या रिक्षावाल्या आजोबांची संघर्षगाथा

सामान्यातला हिरो! दोन्ही मुलांना गमावल्यानंतर 7 जणांची घेतली जबाबदारी; मुंबईच्या रिक्षावाल्या आजोबांची संघर्षगाथा

दोन्ही मुलांचा मृत्यूनंतर परिस्थितीसमोर न झुकता, उलट परिस्थितीला आव्हान देणारे हे मुंबईतले आजोबा आहेत. ज्यांनी आपल्या नातीला शिक्षिका बनवण्याचं स्वप्न पाहिलं आहे. वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी!

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी: अनेकांची हिरो नावाची संकल्पना केवळ चित्रपटांपुरतीच मर्यादित असते. पण फार कमी वेळा सामन्य व्यक्तीच्या रुपात आपल्याला हिरोचं दर्शन होतं असतं. अशीच कहाणी आहे मुंबईतील या वृद्ध व्यक्तीची आयुष्याच्या लढाईत आलेल्या संकटांनी कोलमडून न जाता, तर खंबीरपणे उभं राहून संकटांना आव्हान देण्याच काम या वृद्ध व्यक्तीनं केलं आहे. खरंतर 6 वर्षांपूर्वी त्यांच्या मोठ्या मुलाचं निधन झालं आणि दोन वर्षांपूर्वी छोट्या मुलाने आत्महत्या केली. पोटच्या दोन्ही मुलांना चिता देवूनही चेहऱ्यावर हास्य ठेवून आयुष्याची झगडणाऱ्या या बाबांची अनोखी कहाणी आहे. ही संर्घषगाथा @officialhumansofbombay या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

सहा वर्षांपूर्वी त्यांचा मोठा मुलगा घरातून अचानक गायब झाला. एक आठवड्यानंतर त्याचा मृतदेह एका ऑटो रिक्षामध्ये सापडला. त्यांचा मोठा मुलगा 40 वर्षांचा होता. या घटनेंतर या आजोबांनी दुःखाला मिठी न मारता आपल्या कुटुंबाला जगवण्यासाठी दुसऱ्या दिवशीपासून रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनी घटनेची पुनरावृत्ती होत, छोट्या मुलानेही आत्महत्या केली. लोकांनी फोन करून सांगितलं की, तुमच्या मुलाने आत्महत्या केली आहे. त्याचा मृतदेह प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर आढळला आहे. त्यांच्या आयुष्यातला हा दुहेरी झटका पचवनं थोडंसं अवघड होतं.

हे ही वाचा-VIDEO : व्हर्च्युअल सुनावणीदरम्यान आरोपी चक्क न्यायाधीशांना म्हणाला, I LOVE YOU

कारण पाठीमागे सुन आणि तिची चार मुलं सांभाळण्याची जबाबदारी या वृद्धाच्या खांद्यावर येऊन ठेपली होती. लहान मुलाच्या चितेला आग दिली, 'तेव्हा माझ्या सर्वात मोठ्या नातीने मला विचारलं की दादा मी आता शाळा सोडायची आहे का? त्यावेळी सर्व ताकद एकवटून मी तिला आश्वासन दिलं की, नाही! तुला जे हवं ते तू शिकू शकतेस,' हे वाक्य आहे, या लढवय्या आजोबांची. त्यानंतर त्यांनी जास्त वेळा रिक्षा चालवायाला सुरू केला. यातुन त्यांना महिन्याला 10 हजार रुपये मिळू लागले. यातून नातीच्या शिक्षणाचा खर्च 6 हजार आणि उरलेल्या 4 हजारांत घरखर्च चालवायचा अशी आर्थिक गणितं त्यांनी आखली.

या आजोबांच्या नातीने जेव्हा बारावीत 80 टक्के गुण प्राप्त केले, तेव्हा या दिलदार आजोबांनी एक दिवस प्रवाशांना फुकट सेवा दिली. त्यांच्या नातीने जेव्हा पुढील शिक्षणासाठी दिल्लीला जायचं असल्याचं सांगितलं तेव्हा या आजोबांनी मुंबईतील त्यांच राहतं घरं विकलं आणि शिक्षणासाठी पैसा उभा केला. त्यानंतर आपल्या कुटुंबाला गावी नातेवाईकांकडे पाठवून हे लढवय्ये आजोबांनी रिक्षालाच आपलं घर बनवलं आहे. ते मुंबईत राहुनच रिक्षा चालवण्याचं काम करतात. रिक्षातचं खायचं आणि रिक्षातचं झोपायचंही, असा त्यांचा दैनंदिन उपक्रम आहे.

आयुष्यात एवढा संघर्ष केल्यानंतरही त्यांनी कधी परिस्थितीला दोष दिला नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि डोळ्यात नातीचं शिक्षिका बनण्याचं स्वप्न दिसतं. त्यांनी यावेळी म्हटलं की, 'ती शिक्षिका बनून तिचं स्वप्न कधी पूर्ण करेल, याचीच मी वाट पाहत आहे. जेणेकरून मी तिला मिठी मारून म्हणू शकेल, ‘तु माझा अभिमान वाढवला आहे.’ कारण ती या आजोबांच्या कुटुंबातील पदवी पूर्ण करणारी पहिली व्यक्ती असणार आहे.

Published by: News18 Desk
First published: February 13, 2021, 8:24 AM IST

ताज्या बातम्या