मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /लावा धंद्याला! राज्यात कॅसिनो-गेमिंग सुरू करा, मनसेची थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

लावा धंद्याला! राज्यात कॅसिनो-गेमिंग सुरू करा, मनसेची थेट मुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

'मुंबई, लोणावळा, लवासा, महाबळेश्वर, अलिबाग अशा पर्यटनस्थळी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर कॅसिनोला परवानगी द्यावी'

'मुंबई, लोणावळा, लवासा, महाबळेश्वर, अलिबाग अशा पर्यटनस्थळी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर कॅसिनोला परवानगी द्यावी'

'मुंबई, लोणावळा, लवासा, महाबळेश्वर, अलिबाग अशा पर्यटनस्थळी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर कॅसिनोला परवानगी द्यावी'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 08 फेब्रुवारी : राज्यात एकीकडे बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित असताना मनसेनं थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे राज्यात कॅसिनो सुरू करण्याची मागणी केली आहे. मनसेच्या या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

    राज्यातील पर्यटन, एंटरटेन्टमेन्ट आणि गेमिंग क्षेत्राला चालना देऊन रोजगार तसंच महसूल वाढीसाठी गेमिंग झोनला परवानगी देण्यासाठी मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये राज्यात कॅसिनो सुरू करावा अशी मागणीच केली आहे. अमेरिका, मलेशिया, थायलंड, मकाऊ सारख्या आंतरराष्ट्रीय देशात आणि गोव्यात मोठ्या प्रमाणात कॅसिनो-गेमिंगला परवानगी दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटन उद्योगाचा विकास झाला आहे, असा दावाच या पत्रात केला आहे.

    (...म्हणून थोरातांनी उपसले राजीनामास्त्र, काँग्रेसमधील राजकारणाची INSIDE STORY)

    गोवा राज्यात ऑफशोअर 6 कॅसिनो आणि ऑनशोअर 8 कॅसिनो आहेत. सिक्कीममध्येही पंचतारांकित हॉटेलमध्ये परवानगी दिली आहे. पण आपल्याकडे कॅसिनो-गेमिंगबाबातच्या बुरसटलेल्या विचारांमुळे आपल्याच राज्यात विधिमंडळात पारित केलेला महाराष्ट्र कॅसिनोज (नियंत्रण आणि कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून धूळखात पडला आहे. पण, याबद्दल अधिसूचना काढलेले नाही. 10 मे 2022 रोजी पर्यटन संचालनालयाचे सचिव प्रधान सचिवांनी अभ्यासगट स्थापन करून गोवा, सिक्कीम, मकाऊ आणि नेपाळमध्ये कॅसिनोची पाहणी केली होती पण पुढे काहीही झालं नाही, असा दावाही करण्यात आला आहे.

    (मुंब्र्याच्या नामकरणावरून राजकारण तापलं; भाजपने पुन्हा आव्हाडांना डिवचलं)

    2018-19 मध्ये गोव्याला कॅसिनो आणि गेमिंगमधून 411 कोटींचा महसूल मिळाला होता. अमेरिकेतील ग्लोबल मार्केट अॅडवहायजर्स या अर्थविषयक संशोधनानुसार, महाराष्ट्रात जर कॅसिनो सुरू केले तर 1.1 बिलियन अमेरिकन डॉलर्स महसूल मिळेल. तसंच कॅसिनो गेमिंगवर 28 टक्के जीएसटीमुळे सरकारला 308 टक्के जीएसटीही मिळेल, असा दावाही मनसेनं केला आहे.

    त्यामुळे, मुंबई, लोणावळा, लवासा, महाबळेश्वर, अलिबाग अशा पर्यटनस्थळी आणि कोकणाच्या किनारपट्टीवर कॅसिनोला परवानगी द्यावी, अशी मागणीच मनसेनं केली आहे.

    First published:

    Tags: Raj Thackery