मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

st bus strike : आझाद मैदानातून संपकरी कर्मचाऱ्यांना हटवणार? पोलिसांचा ताफा पोहोचला

st bus strike : आझाद मैदानातून संपकरी कर्मचाऱ्यांना हटवणार? पोलिसांचा ताफा पोहोचला

संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला. पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला. पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला. पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे.

मुंबई, 20 डिसेंबर : एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये (mva government) विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या दीड महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर (mumbai azad maidan) आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचे (ST bus Strike) आंदोलन चिरडण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचारी संघटनेनं माघार घेतल्यानंतर आझाद मैदानावर पोलीस ताफा दाखल झाला आहे. त्यामुळे हालचालींना वेग आला आहे.

एसटी बस कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आज हायकोर्टामध्ये सुनावणी पार पडली. त्यानंतर संध्याकाळी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत संप पुकारणाऱ्या संघटनेनं बैठक घेऊन संप मागे घेत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर संध्याकाळपासून आझाद मैदानावर पोलिसांचा मोठा ताफा दाखल झाला.  पाणी मारा करणारं वरुण वाहन आणि दंगा नियंत्रण पथक दाखल झाले आहे. त्याचबरोबर डोंगरी, जे जे आणि कफपरेड पोलीस ठाण्याची अतिरिक्त कुमक पोहोचली आहे.  आंदोलकांना घोषणा न देण्याची सूचना पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान, एसटी कर्मचारी संघटनेने 21 ऑक्टोबर 2021 रोजी राज्य सरकारला सर्वात आधी संपाची नोटीस दिली होती त्या संघटनेचे नेते अजय गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. गुजर यांची आज परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासोबत मंत्रालयात जवळपास पाच तास चर्चा झाली. या चर्चेनंतर गुजर यांनी संपातून माघार घेत असल्याची घोषणा केली. तसेच आपण संपकरी कर्मचाऱ्यांना आवाहन करु, आझाद मैदानात जाऊ, असंही ते म्हणाले.

'विलीनीकरणाच्या निर्णयाला वेळ लागणार'

तरदुसरीकडे,  एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST Employees) याचिकेवर आज मुंबई हायकोर्टात (Mumbai High Court) सुनावणी झाली. या सुनावणीत त्रिसदस्यीय समितीने आपला प्राथमिक अहवाल कोर्टात सादर केला. या अहावालात एसटीचं राज्य शासनात विलीनीकरणाच्या विषयावर भूमिका मांडण्यात आली होती. विलीनीकरणाचा मुद्दा हा थोडा अवघड आहे. त्याला वेळ लागेल, असं अहवालात नमूद करण्यात आलं होतं.

कर्मचाऱ्यांना मिळणार नोटीसा!

दरम्यान, महामंडळाचे वकील जी एस हेगडे यांनी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्याची मागणी केली आहे. '२२ डिसेंबरला राज्यसरकार ३४३ कर्मचाऱ्यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावणार आहे. आम्हाला संपूर्ण अहवाल बनवण्यासाठी ३ फेब्रुवारीपर्यतचा वेळ लागणार असून या तारखेपर्यंत अहवाल पूर्ण होईल अशी सरकारच्या वतीने सांगण्यात आलं आहे, अशी माहिती हेगडे यांनी दिली.

तसंच, गुणरत्न सदावर्ते काहीही म्हणत असले तरी कामावर न येणे,  कामावर जाण्यापासून परावृत्त करणे, दुखवटा किंवा अन्यकाही कारणं सांगितली तरी तो न्यायालयाचा  अवमान आहे. तसंच आज ४० हजार कर्मचाऱ्यांचे अर्ज सदावर्ते यांनी सादर केले तसंच भविष्यात आणखी ३० हजार कर्मचाऱ्यांचे अर्ज दाखल करतो, असे सांगितले आहे. त्यामुळे या सर्वांनी हे मान्य केलं आहे की आम्ही कामावर नाहीत असं, त्यामुळे या सर्वांनाही न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी नोटीस बजावावी अशी आम्ही मागणी करणार आहोत, असंही हेगडे यांनी सांगितलं.

त्यामुळे सुरुवातीचे 343 आणि नंतरचे सुमारे 80 हजार कर्मचारी अशा सर्वांवर न्यायालयाने अवमान केल्याप्रकरणी नोटिसा बजावल्या जाव्या अशी आमची मागणी असेल असे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचा लढा आणखी चिघळणार असे दिसून येत आहे.

First published:

Tags: Mumbai azad maidan