मुंबई, 13 जुलै : कोरोनाची तिसरी लाट आणि कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंटचा धोका यात मुंबईकरांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे. मुंबईत आता तिसरी कोरोना लसही (Third corona vaccine in Mumbai) उपलब्ध झाली आहे. कोविशिल्ड, कोवॅक्सिननंतर आता स्पुतनिक V लशीचा पर्यायही मुंबईकरांसाठी (Sputnik V in Mumbai) उपलब्ध झाला आहे. आता रशियाची (Russian corona vaccine in Mumbai) स्पुतनिक लसही मुंबईकरांना घेता येणार आहे.
मुंबईतील कमीत कमी चार रुग्णालयांना स्पुतनिक V लशीचा (Sputnik V available at Mumbai's Hospital) स्टॉक मिळाला आहे. कोविनवर उपलब्ध माहितीनुसार मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ड हॉस्पिटल, महालक्ष्मीमधील SRCC चिल्ड्रन हॉस्पिटल, घाटकोपरमधील झायनोव्हा शाल्बे हॉस्पिटल, माहीममधील एसएल रहेजा हॉस्पिटलमध्ये स्पुतनिक लस दिली जाते आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार वोक्हार्टच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून स्पुतनिक लस देणं सुरू केलं. Zynova Shalby च्या मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी शिवाजी दुबे यांनी सांगितलं की सोमवारी 110 लोकांना स्पुतनिक लस देण्यात आलं. तर SRCC च्या वैद्यकीय अधीक्षक झुबिन पेरिरा यांनी सांगितलं, त्यांना गेल्या आठवड्यातच स्पुतनिकचा स्टॉक उपलब्ध झाला आणि 5 जुलैपासूनच लसीकरण सुरू करण्यात आलं.
हे वाचा - काय हे! कोरोना पळाला की काय? मोदींच्या राज्यातच आहे ही अवस्था
अनेक जण या लशीची प्रतीक्षा करत होते कारण रशियानं विकसित केलेल्या स्पुतनिक लशीच्या दोन डोसमधील अंतर 21 दिवस निश्चित करण्यात आलं आहे. सध्या उपलब्ध असलेल्या कोवॅक्सिन लशीचा दुसरा डोस 28 दिवसांनी तर कोविशिल्डचा दुसरा डोस 84 दिवसांनी घेता येतो. दुसऱ्या डोससाठी खूप प्रतीक्षा करावी लागते. पण स्पुतनिकमुळे फक्त 21 दिवसांतच मुंबईकरांना कोरोना लशीचे दोन्ही डोस मिळतील आणि त्यांना कोरोनापासून पूर्ण सुरक्षा कवच मिळेल.
हे वाचा - मोठी बातमी! भारतातील पहिला कोरोना रुग्ण पुन्हा व्हायरसच्या विळख्यात
मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली आहे. रशियाने तयार केलेली स्पुतनिक लस भारतात वितरित करण्याबाबत हैदराबादमधील डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजशी करार झाला आहे. ही लस देशातील 50 शहरांमध्ये पाठवण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, कोल्हापूर या शहरांचाही समावेश आहे. स्पुतनिक व्ही लशीच्या एका डोसची किमंत 1142 रुपये निश्चित करण्यात आलेली आहे. सायन्स जर्नल असलेल्या द लँसेटनं या लसीचे शेवटच्या टप्प्यातील निष्कर्ष प्रकाशित केले आहेत. ही लस कोरोनाविरुद्ध जवळपास 92 टक्के प्रभावी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Mumbai