मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'हा' व्यक्ती समीर वानखेडेंसाठी वसुली करतो, SPECIAL 26' चा लेटरबॉम्ब टाकत नवाब मलिकांनी नाव केलं जाहीर

'हा' व्यक्ती समीर वानखेडेंसाठी वसुली करतो, SPECIAL 26' चा लेटरबॉम्ब टाकत नवाब मलिकांनी नाव केलं जाहीर

Nawab Malik letter bomb: नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट करत लेटरबॉम्ब टाकला आहे.

Nawab Malik letter bomb: नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट करत लेटरबॉम्ब टाकला आहे.

Nawab Malik letter bomb: नवाब मलिक यांनी आणखी एक ट्विट करत लेटरबॉम्ब टाकला आहे.

मुंबई, 26 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आणखी एक ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. नवाब मलिकांनी एक पत्र ट्विट केलं आहे जे त्यांना एका एनसीबीच्याच अज्ञात अधिकाऱ्याने पाठवले आहे. या पत्रात हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. 26 प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 26 प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. यासोबतच अशा व्यक्तीचं नाव जाहीर केलं आहे जो समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासाठी वसुली करतो.

या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी असंही नवाब मलिकांनी म्हटलं आहे.

या पत्रात म्हटले आहे की, "मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे गेल्या दोन वर्षांपासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. गेल्यावर्षी जेव्हा एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणात ड्रग्ज प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला तेव्हा महानिर्देशक राकेश अस्थाना यांनी एसआयटी स्थानप करत कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचा प्रभारी बनवत मुंबईमधील ड्रग्ज प्रकरणाचा तपास सोपवला सोबतच समीर वानखेडे जे मुंबईत कार्यरत होते त्यांना गृहमंत्री अमित शहा यांच्या सांगण्यावरुन डीआरआय येथून एनसीबी मुंबईत झोनल डायरेक्टर पदावर घेण्यात आलं. राकेश अस्थाना यांनी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना कुठल्याही प्रकारे बॉलिवूड कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात अडकवून त्यांच्यावर केस दाखल कऱण्याचे आदेश दिले. त्यानुसार दोन्ही अधिकाऱ्यांनी बॉलिवूड कलाकारांवर खोटे गुन्हे दाखल केले. गुन्हे दाखल झाल्यावर मल्होत्रा आणी समीर वानखेडे यांनी या कलाकारांकडून कोट्यवधींची मागणी केली. ही वसुली बॉलिवूडचे कलाकार (दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकाश, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, सोविक चक्रवर्ती, अर्जुन रामपाल) यांच्याकडून वकील अय़ाज खानने घेतले". हे पत्र ट्विट करत नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे.

वाचा : 'मुंबई आणि ठाण्यातून वानखेडेंकडून बेकायदा फोन टॅपिंग, अनेक पुरावे हळूहळू बाहेर काढणार' : नवाब मलिक

मलिकांचा पत्रकार परिषदेत गौप्यस्फोट

नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे. यासोबतच एनसीबी (NCB) अधिकारी सचिन वानखेडे (Sachin Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे... ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे नाव आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. पूर्ण परिवार मुस्लिम म्हणुन जगत आहेत, हे सत्य आहे. दलित संघटनांबरोबर आम्ही बोलत आहोत. या बाबतीत दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल. जातवैधता समितीसमोर समीर वानखेडे यांचा दाखला पाठवणार आहोत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

26 प्रकरणांतून फसवणूक

नवाब मलिकांनी म्हटलं, आज मी एक पत्र ट्विट केले आहे. हे पत्र एनसीबीतील एका अधिकाऱ्याने पाठवले, नाव गुप्त आहे. हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. 26 प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 26 प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी.

इतर पुरावे हळूहळू बाहेर काढणार

पत्रात ज्या प्रकारे उल्लेख आहे त्या प्रमाणे हे सगळं आहे. माझ्याकडे अजून एक व्यक्ती आली आहे त्यांनी असं सांगितले की, त्यांच्याकडून 50 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नायजेरियन व्यक्तीला अडकवले गेले. मी बहीण, पत्नी, वडील यांच्याबद्दल कधीच द्वेष ठेवत नाही. जर हा जन्म दाखला खोटा असेल तर खरा जन्म दाखला दाखवा. वानखेडेंनी धर्मपरिवर्तन केलं नाही तर खरा दाखला समोर आणावा. माझ्याकडे अजूनही काही कागदपत्रे आहेत ती हळू हळू बाहेर काढेन.

आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. माझे प्रश्न समीर वानखेडे यांच्या बाबतीत आहे. क्रांती रेडकर बाबात मला जास्त खोलात जायचे नाहीये. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी समोर आणाव्या लागत आहेत असंही नवाब मलिक म्हणाले.

बेकायदा फोन टॅपिंग

समीर वानखेडे यांनी कोणत्या कारणास्तव माझ्या मुलीचा सीडीआर मागितला आहे? वानखेडे स्वत:च्या सीमा पार करत आहेत. समीर वानखेडे फोन टॅप करत आहेत एक मुंबईत आणि ठाण्यातून फोन टॅप केला जात आहे. माझ्या मुलीचा सीडीआर मुंबई पोलिसांकडे मागितला... पण तो पोलिसांनी दिला नाही. आता ही लढाई सुरू राहील. कोणत्या अधिकारात वानखेडे माझ्या मुलीची खासगी माहिती मागत आहेत? एनसीबी डिपार्टमेंटला नवाब मलिकचा फोबीया झालाय का ? आमची लढाई एनसीबी संस्थेशी नाहीये. मिस्टर दाऊन वानखेडे माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोका मी तुम्हाला आव्हान देतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं.

First published:

Tags: Drug case, Nawab malik, NCB