मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

'मुंबई आणि ठाण्यातून वानखेडेंकडून बेकायदा फोन टॅपिंग, अनेक पुरावे हळूहळू बाहेर काढणार' : नवाब मलिक

'मुंबई आणि ठाण्यातून वानखेडेंकडून बेकायदा फोन टॅपिंग, अनेक पुरावे हळूहळू बाहेर काढणार' : नवाब मलिक

One more serious allegation of Nawab Malik against Sameer Wankhede: नवाब मलिक यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गंभीर आरोप केला आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 26 ऑक्टोबर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत गौप्यस्फोट केला आहे. यासोबतच एनसीबी (NCB) अधिकारी सचिन वानखेडे (Sachin Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. समीर वानखेडे यांनी बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. यासोबतच नवाब मलिक यांनी एक पत्रही ट्विट केलं आहे जे एनसीबीतील एका अज्ञात अधिकाऱ्याकडून त्यांना प्राप्त झाले आहे.

नवाब मलिक यांनी म्हटलं, एनसीबीच्या विरोधात आमची लढाई एनसीबीच्या विरोधात नाहीये. एनसीबीने गेल्या काही वर्षांत खूप काही चांगले काम केले आहे. एनसीबी चांगले काम करत आहे. मात्र एक व्यक्ती बोगस प्रणापत्रावर नोकरीत आला. मागील दोन दिवसांपासून समीर वानखेडे यांच्याबाबत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. 6 तारखेपासुन आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले. असं म्हटलं जातंय की, सर्व कुटुंबाला याला खेचले जात आहेत पण आम्ही असे केले नाही. यात हिंदू - मुस्लिम मी आणले नाही, मी कधीही धर्माच्या नावावर राजकरण केलं नाही. ख्रिचन आणि मुस्लीम यांनी धर्म बदलला तर जात समाप्त होते.

बोगस प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवल्याचा पुनरुच्चार

या व्यक्तीने बनावट जात प्रमाणपत्र घेऊन नोकरी मिळवली, एस सी सर्टीफिकेट मिळवले. जे जन्म प्रमाणपत्र आम्ही ट्विट केलं आहे ते खरं आहे. तो जन्म दाखला खरा आहे... ज्या जन्म प्रमाणपत्रावर समीर दाऊद वानखेडे नाव आहे. मी दिलेल्या माहितीवर ठाम आहे. पूर्ण परिवार मुस्लिम म्हणुन जगत आहेत, हे सत्य आहे. दलित संघटनांबरोबर आम्ही बोलत आहोत. या बाबतीत दलित संघटना तक्रार करतील. अनेक लोक तक्रार करणार आहेत. सत्य देशासमोर येईल. जातवैधता समितीसमोर समीर वानखेडे यांचा दाखला पाठवणार आहोत असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

वाचा : "NCBच्या अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र मिळालं, 'Special 26' ची माहिती प्रसिद्ध करणार"

26 प्रकरणांतून फसवणूक

नवाब मलिकांनी म्हटलं, आज मी एक पत्र ट्विट केले आहे. हे पत्र एनसीबीतील एका अधिकाऱ्याने पाठवले, नाव गुप्त आहे.

हे पत्र त्यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री यांना पाठवले आहे. 26 प्रकरणांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. 26 प्रकरणांत कशी फसवणूक झाली याची माहिती पत्रात आहे. या पत्रात असं आहे की लोकांना यामध्ये अडकवले जात आहे, खोट्या केस बनवल्या जात आहे असं उल्लेख आहे. एनसीबीने आता चौकशी बसवली आहे, या गोष्टींचा सुद्धा चौकशी करावी. या पत्राबाबत सुद्धा चौकशी करण्यात यावी. वसुली करण्यात आली आहे. एनसीबीमध्ये चुकीच्या पद्धतीने काम सुरू आहे, त्याची चौकशी करावी.

इतर पुरावे हळूहळू बाहेर काढणार

पत्रात ज्या प्रकारे उल्लेख आहे त्या प्रमाणे हे सगळं आहे. माझ्याकडे अजून एक व्यक्ती आली आहे त्यांनी असं सांगितले की, त्यांच्याकडून 50 कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या आणि नायजेरियन व्यक्तीला अडकवले गेले. मी बहीण, पत्नी, वडील यांच्याबद्दल कधीच द्वेष ठेवत नाही. जर हा जन्म दाखला खोटा असेल तर खरा जन्म दाखला दाखवा. वानखेडेंनी धर्मपरिवर्तन केलं नाही तर खरा दाखला समोर आणावा. माझ्याकडे अजूनही काही कागदपत्रे आहेत ती हळू हळू बाहेर काढेन.

आमच्याकडे सगळे पुरावे आहेत त्यांनी इस्लाम धर्म स्वीकारला होता. माझे प्रश्न समीर वानखेडे यांच्या बाबतीत आहे. क्रांती रेडकर बाबात मला जास्त खोलात जायचे नाहीये. सत्य समोर आणण्यासाठी काही गोष्टी समोर आणाव्या लागत आहेत असंही नवाब मलिक म्हणाले.

बेकायदा फोन टॅपिंग

समीर वानखेडे यांनी कोणत्या कारणास्तव माझ्या मुलीचा सीडीआर मागितला आहे? वानखेडे स्वत:च्या सीमा पार करत आहेत.

समीर वानखेडे फोन टॅप करत आहेत एक मुंबईत आणि ठाण्यातून फोन टॅप केला जात आहे. माझ्या मुलीचा सीडीआर मुंबई पोलिसांकडे मागितला... पण तो पोलिसांनी दिला नाही. आता ही लढाई सुरू राहील. कोणत्या अधिकारात वानखेडे माझ्या मुलीची खासगी माहिती मागत आहेत? एनसीबी डिपार्टमेंटला नवाब मलिकचा फोबीया झालाय का ? आमची लढाई एनसीबी संस्थेशी नाहीये. मिस्टर दाऊन वानखेडे माझ्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोका मी तुम्हाला आव्हान देतो असंही नवाब मलिकांनी म्हटलं.

First published:

Tags: Drug case, Nawab malik, NCB