जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / पित्याकडे सोपवण्याचा आदेश देताच चिमुरड्याने फोडला टाहो! अखेर प्रकरण पुन्हा कोर्टात

पित्याकडे सोपवण्याचा आदेश देताच चिमुरड्याने फोडला टाहो! अखेर प्रकरण पुन्हा कोर्टात

मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्ट

मुंबई हायकोर्टात एका मुलाच्या कस्टडीवरुन चांगला गोंधळ झालेला पाहायला मिळाला.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : कायदा कायद्याचं काम करतो. कोर्टातही कायद्यानंच निर्णय होतात. मात्र, लहान मुलांना कायदा काय असतो? कायद्यानं घेतलेल्या निर्णयाचा लहान मुलांवर कसा परिणाम होतो. याचं दुर्दैवी उदाहरण आज कोर्टात दिसून आलं. अवघ्या 11 वर्षाच्या चिमुरड्याच्या करुण किंकाळ्यानी, कोर्टाच्या स्थितीप्रज्ञ वातावरणातही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कायदा श्रेष्ठ की भावना श्रेष्ठ? हीच चर्चा या प्रसंगानंतर रंगली होती. काय आहे प्रकरण? दुपारच्या सुट्टीनंतर मुंबई हायकोर्टाचं कामकाज सुरु झालं. एका अवघ्या 11 वर्षाच्या चिमुरड्याच्या कस्टडीची केस होती. हा मुलगा अवघा 5 वर्षांचा असताना त्याच्या आईनं कॅन्सरशी झगडत या जगाचा निरोप घेतला. तेव्हापासूनच हा मुलगा बोरिवलीत मामाकडेच राहतो. त्याचं पालनपोषण, शिक्षण सगळंच मामा करतो. याच मुलाच्या वडिलांनी, मुलाच्या ताब्यासाठी हायकोर्टात धाव घेतली होती. केसची सुनावणी झाली. कोर्टानं चक्क त्या लहान मुलालाही कोर्टात बोलावून विचारलं की कुठे रहायला आवडेल? मुलानंही मामाकडेच हे उत्तर दिलं. मात्र, आईविना मुलाच्या योग्य भविष्यासाठी, कायदा आधारावर कोर्टानं, मुलाची कस्टडी त्याच्या जन्मदात्या पित्याकडेच सोपवण्यात आली. वाचा - नवी मुंबईत लोकल ट्रेनचा अपघात; रुळांवरून घसरले तीन डब्बे; Video आदेश झाला. सर्व कोर्ट आवारातून बाहेर आले. कस्टडी मिळालेल्या पित्यानं चिमुरड्याला कडेवर घेतलं आणf मुलाने टाहो फोडला. मला मामाकडेच जायचं, असा घोष त्यानं लावला. हा चिमुरडा इतका आक्रमक झाला की वडील, पोलीस यांनाही त्याला आवरणं मुश्किल झालं. जन्मदात्या पित्यालाही या मुलानं बोचकारून जखमा केल्या. खरंतर मामानेही पित्याला कस्टडी द्यायला कोर्टात जोरदार विरोध केला होता. जवळपास 20 मिनिटं हे सर्व नाट्य सुरु होतं. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत त्या मुलासहीत सगळ्यांना घेऊन पुन्हा कोर्टात नेलं. आता यात कोर्ट काय तोडगा काढणार हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी चर्चा मात्र एकच रंगली होती की कायद्यात भावनेला थारा नाही का?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात