मुंबई, 21 डिसेंबर : गुजरातमधील सोहराबुद्दीन शेख एन्काऊंटरप्रकरणी सीबीआय कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. सोहराबुद्दीन यांचा मृत्यू गोळी लागूनच झाला आहे, पण त्याचवेळी सोहराबुद्दीन यांच्या मृत्यूमागे कोणताही कट असल्याचा पुरावा नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे. याप्रकरणातील सर्व 22 आरोपींची कोर्टाने पुराव्यांअभावी सुटका केली आहे. देशभरात गाजलेल्या या प्रकरणाचा अखेर 13 वर्षांनंतर निकाल लागला आहे. काय आहे कोर्टाचा निर्णय? -कट रचण्याचा आरोप सिद्ध करता आला नाही, पुरेसा पुरावा नव्हता - कोर्ट -तुलसीरामचं अपहरण झालेलं, हेही सिद्ध झालेलं नाही -साक्षीदार फितूर होणं, यात सरकारी वकीलांचा दोष नाही -सोहराबुद्दीनचा मृत्यू गोळी लागून झाला हे निश्चित आहे -पण ज्यांचावर आरोप झाला आहे ते याला जबाबदार आहेत, याबाबत सबळ पुरावा नाही काय आहे प्रकरण? सोहराबुद्दीन शेख आणि त्यांची पत्नी कौसर बी यांचा 2005 मध्ये तर तुलसीराम प्रजापती यांचा 2006 मध्ये मृत्यू झाला होता. भाजपचे विद्यमान अध्यक्ष आणि गुजरातचे तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शाह आणि गुजरातच्या तत्कालीन वरिष्ठ अधिका-यांच्या इशा-यावरूनच या बनावट चकमकी करण्यात आल्या असल्याचा आरोप होता. मात्र 2014 साली शाह यांची या प्रकरणात निर्दोष मुक्तता करण्यात आली. सीबीआय कोर्टाचे न्यायाधीश एस जे शर्मा यांनी याप्रकरणी आपण 21 डिसेंबरपर्यंत निकालपत्र पूर्ण करू आणि उशीरात उशीरा म्हणजे 24 डिसेंबरपर्यंत अंतिम निकाल देऊ, असं म्हटलं होतं. या प्रकरणात एकूण 38 आरोपी होते, यातील 16 जणांची पुराव्याच्या अभावी याआधीच सुटका करण्यात आली होती. आता उर्वरित आरोपींचीही सबळ पुराव्यांअभावीच सुटका करण्यात आली आहे. VIDEO : सोलापूरचा ‘सुल्तान’ अवघ्या 15 सेकंदात केलं चितपट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.