जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / वेब सीरीजमध्ये काम देण्याचं आमिष दाखवत शूट केला पॉर्न व्हिडीओ, गुन्हा दाखल

वेब सीरीजमध्ये काम देण्याचं आमिष दाखवत शूट केला पॉर्न व्हिडीओ, गुन्हा दाखल

File Photo

File Photo

Crime in Mumbai: वेब सीरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत (Lure of give role in Web series) एका मॉडेलचे अश्लील व्हिडीओ (Pornographic Video) चित्रीत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 09 जून: वेब सीरीजमध्ये काम मिळवून देण्याचं आमिष दाखवत (Lure of give role in Web series) एका मॉडेलचे अश्लील व्हिडीओ (Pornographic Video) चित्रीत केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी दिग्दर्शक आणि त्याच्या अन्य साथीदारांनी मॉडेलला एका बंगल्यात बोलावून तिचे अश्लील व्हिडीओ शूट केले आहेत. यानंतर आरोपींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral) करत संबंधित मॉडेलची बदनामी केली आहे. या प्रकरणी पीडित मॉडेलनं मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (FIR) केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणलाही अटक केली नसून घटनेचा तपास सुरू केला आहे. पीडित तरुणी व्यवसायाने मॉडेल आहे. तिने काही काळ मॉडेलिंगमध्ये काम केल्यानंतर, आता ती बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी प्रयत्न करत होती. दरम्यान दिग्दर्शक असलेल्या एका व्यक्तीने तिला फोन केला आणि आपण एक वेब सीरीज चित्रीत करत असल्याचं तिला सांगितलं. त्याचबरोबर वेब सीरीजमध्ये मुख्य नायिकेची भूमिका देण्याच आमिषही दिग्दर्शकाने तिला दाखवलं. कामाच्या शोधात असणाऱ्या मॉडेलला समोरून ऑफर आल्यामुळे तिनेही त्वरित होकार कळवला. दरम्यान दिग्दर्शकाने तिला एका मालवणी परिसरातील एका बंगल्यात बोलवलं. याठिकाणी दिग्दर्शकासोबत अन्य तीन लोकं आधीपासूनच उपस्थित होते. त्यांनी वेब सीरीजच्या नावाखाली पीडित मॉडेलचे काही अश्लील व्हिडीओ चित्रीत केले. यानंतर आरोपींनी हा अश्लील व्हिडीओ सोशल मीडियावर ‘जीजा का पिझ्झा’ या नावाने अपलोड केले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर धक्का बसलेल्या तरुणीने त्वरित मालवणी पोलिसांत जाऊन लेखी तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दिग्दर्शकासोबत अन्य तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. हे ही वाचा- मुंबई पोलिसांची कारवाई; वेबसीरिजच्या नावाने सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मालवणी पोलिसांनी अद्याप कोणलाही अटक केली नसून या प्रकरणाचा तपास केला जात आहे. यापूर्वीही मालवणी पोलिसांत अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून आरोपींविरोधात पुरावे गोळा करण्याचं काम सुरू केलं आहे. लवकरच आरोपींना गजाआड केलं जाईल, असं आश्वासनंही पोलिसांकडून देण्यात आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात