जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Web Seriesच्या नावाखाली सुरू होता SEX रॅकेट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

Web Seriesच्या नावाखाली सुरू होता SEX रॅकेट; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

स्पा सेंटरचा मालक अटकेत आहे. राजस्थान पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Mumbai Police busted sex racket: मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जून: सध्या यूट्यूबसह अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मवर विविध वेबसीरिज नव्याने येत असल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, त्याच दरम्यान मुंबईत एक धक्कादायक माहिती उघड झाली आहे. वेब सीरिजच्या (Web Series) नावाखाली मुंबईत चक्क सेक्स रॅकेट (Sex Racket in Mumbai) सुरू होतं. या सेक्स रॅकेटचा भांडाफोड मुंबई पोलिसांनी (Mumbai police) केला आहे. मुंबईतील वर्सोवा परिसरातील एका हॉटेलमध्ये वेबसीरिजच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यावर पोलिसांनी सापळा रचला. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने वर्सोव्यातील या हॉटेलवर धाड टाकून सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेला अटक केली आहे तर 3 मॉडेल्सची सूटका केली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून एकूण 3 जणांची सुटका केली आहे. यापैकी दोन मॉडेल्स असून त्यांचे वय 22 वर्षे आणि 25 वर्षे असे आहेत. तर तिसरी महिला ही मॉडेल नसून तिचे वय 35 वर्षे असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलीली महिला ही वेब सीरिजमध्ये कास्टिंग डायरेक्टर आहे तसेच ब्युटीशियन सुद्धा आहे. पोलिसांना या रॅकेटची माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सापळा रचला. त्यानंतर हा ग्राहक घटनास्थळावर पोहोचल्यावर रॅकेट चालवणाऱ्या महिलेने मुलींना बोलावले. त्याचवेळी पोलिसांनी धाड टाकत रॅकेटचा पर्दाफाश केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात