जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / हृदयद्रावक! विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हृदयद्रावक! विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

हृदयद्रावक! विरारच्या आगीत पतीचा मृत्यू; बातमी कळताच पत्नीचाही ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Virar Hospital fire: विरारमधलील कोविड रुग्णालयाला आगीत 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

विरार, 23 एप्रिल: विरारमधील विजय वल्लभ रुग्णालया (Vijay Ballabh Hospital)तील अतिदक्षता विभागाला रात्रीच्या सुमारास अचानक आग (Fire) लागली. या आगीत तब्बल 14 रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच एका रुग्णाच्या पत्नीला ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचाही मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय कुमार दोषी (Kumar Doshi) यांच्यावर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरू होते. या रुग्णालयाला लागलेल्या आगीत कुमार यांचा होरपळून मृत्यू झाला. कुमार यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त कळताच त्यांच्या पत्नी चांदणी दोषी यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले. कुमार दोषी आणि चांदणी दोषी हे दाम्पत्य वसईतील 100 फूट रोड परिसरात वास्तव्यास होते. कुमार यांच्यावर विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात उपचार सुरू होते तर चांदणी यांच्यावर विरारमधील जिवदानी रुग्णालयात उपचार सुरू होते. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण दोषी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. वाचा:  Virar Hospital Fire: ‘माझी बरी होत आलेली आई गेली हो…’, मुलीची मन हेलावून टाकणारी प्रतिक्रिया; VIDEO मृतकांच्या कुटुंबाला अर्थसहाय्य रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि गंभीर जखमींना 1 लाख रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. या घटनेबाबत मुख्यमंत्रयांनी दु:ख व्यक्त केले आहे. चौकशीचे निर्देश ही आग नेमकी कशामुळे लागली याचा योग्य तपास करावा. हे खासगी रुग्णालय आहे, याठिकाणी अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात