फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी आणि अधिकाऱ्यांबाबत शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट

फडणवीसांचा पहाटेचा शपथविधी आणि अधिकाऱ्यांबाबत शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट

'राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले'

  • Share this:

मुंबई, 21 सप्टेंबर : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही आयपीएस अधिकारी हे ठाकरे सरकार पाडणार असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या विधानामुळे एकच खळबळ उडाली होती. परंतु, आज शिवसेनेनं आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. 'फडणवीस यांनी पहाटे शपथविधी पार पाडला. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले' असा दावा सेनेनं केला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेत सडकून टीकास्त्र सोडले आहे.

राज्यसभेच्या सभापतींची कारवाई, काँग्रेसचे राजीव सातवांसह 8 खासदार निलंबित

'काही अधिकारी आजही उच्चपदी विराजमान आहेत. ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले या थाटात ते वावरत असतात. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. सरकार पाडणे म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम आहे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच' असा सणसणीत टोला सेनेनं लगावला आहे.

अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग

'मुळात फडणवीस यांचे सरकार जाणार नाही या भ्रमात येथील प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. पाच वर्षे फडणवीस व भाजपने एकछत्री अंमल गाजवला. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता व पुनःपुन्हा आम्हीच येणार या विधानाची धुंदी होती. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग झाला होता. अनेक महत्त्वाच्या नेमणुका संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्षेपाने होत असत. पोलीस अधिकारी, आयुक्त, सरकारी वकिलांच्या नेमणुकांत हे सर्रास घडत होते. ' असा खुलासाच शिवसेनेनं केला.

'पहाटेच्या शपथविधी कटात अधिकारी सहभागी'

'सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले' असा खुलासाच सेनेनं केला.

मनसेसैनिकांची मोहिम फत्ते, अशी गाठली लोकल, दुसरा VIDEO

तसंच, 'फडणवीस यांनी पहाटे शपथ घेतली, पण विधानसभेत बहुमत सिद्ध करायचे होते. मात्र शपथ घेतलेले मुख्यमंत्रीच यापुढे कायम राहतील, जुनीच व्यवस्था पुढे चालू राहील असे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस व प्रशासकीय सेवेतले बडे अधिकारी ‘स्युमोटो’ नव्या सरकारची रंगसफेदी करण्याच्या आणि भेगा बुजवण्याच्या कामास लागले. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नाही. फडणवीसांचे सरकार कोसळले व महाविकास आघाडीचे सरकार यायचे ते आलेच. त्यामुळे या मंडळींचे मन खट्टू झाले.' असा दावाही सेनेनं केला.

Published by: sachin Salve
First published: September 21, 2020, 10:40 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading