• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले, दिली जाहीर 'वॉर्निंग'

संजय राऊत किरीट सोमय्यांवर भडकले, दिली जाहीर 'वॉर्निंग'

'भ्रष्टाचाराचे ते सारखे आरोप करत असता. पण ते रोज सकाळी आरशात स्वत: चा चेहरा पाहतात, त्यात त्यांना भ्रष्टाचार झाल्याचा वाटत असेल'

 • Share this:
  मुंबई, 13 नोव्हेंबर : अन्वय नाईक आत्महत्या  (Anvay Naik suicide case) प्रकरणावरून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) वाद पेटला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबात जमीन व्यवहार झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांच्या आरोपानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जाहीरपणे सोमय्यांना वॉर्निंग दिली आहे. 'एका महिलेचं कुंकू पुसलं गेलं. अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून आक्रोश करत आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते काही बोलायला तयार नाही. आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत तेव्हा या प्रकरणाचा तपास भरकटून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी शेटजींच्या पक्षाचे नेते तेव्हा हे अत्यंत फालतू असे मुद्दे घेऊन समोर येत आहे' अशी टीका राऊत यांनी केली. तसंच, 'म्हणे, २१ व्यवहार केले आहे. ते दाखवावे, हा खोटारडेपणाचा कळस आहे. एक लक्षात घ्या, त्यांनाही वॉर्निंग आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे' असा इशाराही राऊत यांनी दिला. 'भ्रष्टाचाराचे ते सारखे आरोप करत असता. पण ते रोज सकाळी आरशात स्वत: चा चेहरा पाहतात, त्यात त्यांना भ्रष्टाचार झाल्याचा वाटत असेल.  ते उलट आरशातच भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत असतील, ते वैफल्यग्रस्त झाले आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 'एका गुन्हेगाराला तुम्ही पाठीशी घालत आहात. तो तुमचा कोण लागत आहे. ती महिला तुमची कुणी लागत नाही का, एका महिलेचा पती मेला आहे, त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाही का, असा संतप्त सवालही राऊत यांनी विचारला. अन्वय नाईक आणि ठाकरे कुटुंबामध्ये जी काही व्यवहार झाले होते, ते पूर्णपणे कायदेशीर आहे. याबद्दल शपथपत्रात सुद्धा माहिती देण्यात आली आहे. कायदेशीर व्यवहारावरून आरोप करण्याचे कोणतेही कारण नाही, असा टीका संजय राऊत यांनी केली. तसंच, आता तुम्हाला घरी बसवले आहेच, त्यामुळे आता पुढील 25 वर्ष घरीच बसावे लागणार आहे, असा टोलाही राऊत यांनी भाजपला लगावला.
  Published by:sachin Salve
  First published: