मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /'मुंबई महापालिका बजेट म्हणजे..' आदित्य ठाकरे यांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले..

'मुंबई महापालिका बजेट म्हणजे..' आदित्य ठाकरे यांनी एका शब्दात विषय संपवला, म्हणाले..

आदित्य ठाकरे यांनी एका शब्दात विषय संपवला

आदित्य ठाकरे यांनी एका शब्दात विषय संपवला

Budget 2023 Updates : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका मांडली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 4 फेब्रुवारी : मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला गेला आहे. यानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. आहे. हे मुंबईकरांचे बजेट नसुन वर्षामधुन छापून आलेले बजेट आहे. यामध्ये सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरू असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. यात आगामी निवडणुकीच्या तोंडावर अनेक घोषणा करण्यात आल्या असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आदित्य ठाकरे?

डावोस दौऱ्यात 40 कोटींची उधळपट्टी करण्यात आली. मात्र, अजुनही त्याचे उत्तर आले नाही. रस्त्यांचा विषय काढल्यावर पालिकेने उत्तर दिले आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कर्नाटकासाठी तरतूद करण्यात आली. मात्र, महाराष्ट्रासाठी भरीव तरतुद नाही. महापालिकेत अधिकार हे लोकप्रतिनिधींना असतो. 50 हजार कोटींचे बजेट आज जाहीर झाले. हे बजेट नेमकं कशासाठी वाढलं? नवीन खर्च यात दिसत नाही. हा अर्थसंकल्प मुंबईकरांचा नसुन वर्षामधुन छापून आलेला आहे. कंत्राटदारांसाठी हे बजेट असल्याचा आरोपही आदित्या ठाकरे यानी केला.

वाचा - विजयानंतर सत्यजीत तांबेंचा 'सर्जिकल स्ट्राईक', फडणवीस, थोरात, पटोले...सगळंच बाहेर काढलं!

सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी : आदित्य ठाकरे

ज्या व्यक्तीने बजेट मांडले आहे, तीच व्यक्ती बजेट ॲप्रुव्ह करणार आहे. वाढीव बजेट सादर करताना पैसा जपून वापरला पाहीजे हे घटनाबाह्य सरकारला सांगितले पाहीजे होते. सगळी उधळपट्टी ही कंत्राटदारांसाठी सुरू आहे. दिल्लीच्या दरवाजाबाहेर कटोरा घेऊन उभं करायचा प्रयत्न या घटनाबाह्य सरकारचा सुरू आहे. ठेवी बाबात आज उत्तर आले. 88 हजार कोटी रिझर्व्ह आहे. 1997 पासुन शिवसेनेने काम केले आणि मुंबईकरांचे पैसे वाचवले. कोस्टल रोड लवकर पुर्ण होईल. कारण यासाठी पैसे वाचवुन ठेवले होते. यावर कोणताही टोल नाही. साडेसात हजार कोटी राज्यसरकारला देणे आहे. या सरकारने ते पैसे महापालिकेला त्वरित द्यावे, अशी मागणीही आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

50 हजार कोटींचा अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प महापालिका प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी सादर केला. ते म्हणाले,  52619.07 कोटी रुपयांचे हे बजेट आहे. प्रथमच 50 हजार कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. 14.50 टक्के अर्थसंकल्पात वाढ करण्यात आली आहे. गेल्या 5 वर्षाशी तुलना केली आता  52 ट्क्के कॅपिटल म्हणजे विकासवर खर्च होणार 48 टक्के इतर गोष्टींवर खर्च होणार आहे. विकास कामांवर प्रथमच 50 टक्के अधिक खर्च केला जाईल.

First published:

Tags: BMC, Mumbai