मुंबई, 15 ऑक्टोबर : ‘तुम्ही वचन मोडलं. आणि मी मुख्यमंत्रिपद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला मी वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली. कदाचित जर दिलेले वचन भाजपने पाळलं असतं तर मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही’ असं विधान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. शिवसेनेचा दसरा मेळावा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये सुरू आहे. यावेळी नेहमी प्रमाणे ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू माता आणि बंधू भगिनींनो…असं म्हणत उद्धव ठाकरे यांच्या भाषणाला सुरुवात झाली. आज दोन मेळावे असतात एक संघाचा आणि आपला मेळावा आहे. विचार एकच आहे, पण धागे वेगळे आहे. विचार एकच आहे म्हणून युती केली होती. आजही त्यांना वाटतं मुख्यमंत्री व्हावं वाटलं असतं. त्यांनी जर शिवसेनेचे वचन मोडलं नसतं तर तुम्ही मुख्यमंत्री झाला असता. पण तुमच्या नशिबात नव्हतं, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला. तसंच, ‘तुम्ही वचन मोडलं. आणि मी हे पद स्विकारलं आणि कारण माझ्या पित्याला वचन दिलं होतं. मी तुमच्या शिवसैनिक मुख्यमंत्री करून दाखवले, असं वचन आणि जबाबदारी घेतली होती. कदाचित जर दिलेले वचन त्यांनी पाळलं असतं तर कदाचित मी राजकीय जिवनातून बाजूला सुद्धा झालो असतो. हे माझं क्षेत्र नाही, मी एक पूत्र कर्तव्य पार पडण्यासाठी ठामपणे उभा आहे’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. ‘हे काही थोतांड नाही. मैं झोला उठाके आया हु, हे असेल कर्म दारिद्रय विचार माझे नाही’ असं म्हणत त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकाही केली. ‘जर तुम्हाला धमकी द्यायची असेल तर स्वत: च्या लायकीनुसार द्या, ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सच्या मागे उभे राहुन काय बोलता. मी सुद्धा आज पक्षप्रमुख म्हणून बोलायचं झालं तर शिवसैनिकांच्या ताकदीतून उत्तर द्यायला तयार आहे. पोलिसांच्या मागे लपून बसायचे म्हणजे हे नामर्दपणा आहे’ अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली. ‘आजचा हा क्षण आपल्यासाठी खूप मोलाचा आहे. बाळासाहेबांनी ज्याची सुरुवात केली होती, तो तुमच्या साक्षीने आपण पुढे नेत आहोत. शस्त्र पुजन केल्यानंतर मी तुमच्यावर फुलं उधळली, कारण तुम्ही माझे खरे शस्त्र आहात’ असंही उद्धव ठाकरे म्हणाले. मला स्वत: मी कधी मुख्यमंत्री आहे असं वाटू देत नाही. कारण मला तसं कधी वाटत नाही. माझं तर असं म्हणणं आहे, मी तुमच्या घरातलाच माणूस आहे. मी तुमचा भाऊ आहे, ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे. काही जण म्हणत होते मी पुन्हा येईन, पण आता बस तिकडेच. कारण संस्कार हे महत्त्वाचे असतात, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना लगावला. मला माझ्या आई-वडिलांनी शिकवलं पदं काय आहे, सत्ता तरी काय आहे, सत्ता येईल परत जाईल आणि पुन्हा येईल, पण कधी आहे मी कधीही अंहकार हा डोक्यात जाऊ देऊ नको, तू नेहमी जनतेशी नम्र राहा, जोरजबरदस्तीने काही मिळवता येत नाही, ते नम्र राहुनच मिळावे लागतात, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







