पालघर,06 ऑक्टोबर: जिल्हा परिषद निवडणुकीतील सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना खासदार राजेंद्र गावित (Shivsena MP Rajendra Gavit) यांना धक्का बसला आहे. पालघर जिल्हा परिषद निवडणुकीत राजेंद्र गावित यांच्या मुलाचा पराभव झाला आहे. रोहित गावित (Rohit Gavit Defeated in Election) निवडणुकीत पराभूत झाले आहेत. वणई गटात भाजपचे पंकज कोरे यांनी खासदार राजेंद्र गावितांच्या चिरंजीवाचा दारुण पराभव केला आहे. भाजपच्या पंकज कोरे हे 3654 मतांनी विजयी झालेत. 412 मतांनी भाजपचे पंकज कोरे विजयावर शिक्कमोर्तब केला आहे. अंतिम निकाल रोहित गावित- शिवसेना 3356 वर्षा वायडा-काँग्रेस 3242 पंकज कोरे-भाजप 3654 विराज गडग-राष्ट्रवादी 2251 खासदार राजेंद्र गावित मीरा रोड येथे वास्तव्यास असून ते मूळचे नंदूरबारचे आहेत. राजेंद्र गावित यांचा मुलगा रोहित गावित यांना वणई गटातून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र जनतेशी कोणत्याही प्रकारचा जनसंपर्क नव्हता, असं समजतंय. त्यांना तिकीट दिल्यानं मतदार संघात आश्चर्य व्यक्त करण्यात आलं होतं. दरम्यान निवडणुकीआधी या भागात असलेल्या काही गावांमध्ये मटण आणि दारुच्या सर्रास पार्ट्या सुरु होत्या. त्यामुळे दारु आणि पार्टीचं आमिष देऊन मतदारांना भुलवण्यात आल्याचंही बोललं गेलं. वणई गटामध्ये एकमेव महिला उमेदवार होत्या. वर्षा भरत वायेडा यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली होती. तर बहुजन विकास आघाडीकडून सारस जाधव रिंगणात होते. पालघर जिल्हा परिषदेच्या रद्द झालेल्या 15 आणि जिल्ह्यातील विविध पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी ही निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस अशी प्रमुख लढत या जागांवर पाहायला मिळाली. या निवडणुकीसाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचार करुन सर्व जिल्हा पिंजून काढला होता. या जिल्ह्यात काँग्रेसची झालेली पिछेहाट पाहात नाना पटोले स्वतः प्रचार करण्यासाठी मैदानात उतरले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.