जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / Maharashtra Assembly Session: अन् विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा...

Maharashtra Assembly Session: अन् विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा...

Maharashtra Assembly Session: अन् विधानपरिषदेत रंगली भडंग, वडा आणि माश्यांची चर्चा...

दोन दिवसांच्या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विषयांवर बोलण्यासाठी वेळ मिळणार नव्हताच. त्यामुळे दोन्ही सभागृहात वातावरण तणाव चे होत

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 जुलै : राजकारणी (Politician) हे २४ तास राजकारणी असले तरी त्यापैकी अनेकांना खाण्याची आवड असते आणि सभागृहात केवळ भ्रष्टाचार (Corruption), प्रकल्प (Project), हेवेदावे या वलबद्दलच चर्चा होते असे नाही. आज याचा प्रत्यय आला. यावेळी अधिवेशनात चक्क भडंग (Bhadang), मासे (Fish) आणि वडा (Vada) याची जोरदार चर्चा रंगल्याचं पहायला मिळालं. पाहूयात या संदर्भातील सविस्तर वृत्त… विधानसभेमध्ये (Vidhan Sabha) पुरवणी मागण्यांवर चर्चा आणि संमती मिळाल्यानंतर अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी या पुरवणी मागण्याचा प्रस्ताव परिषदेत आणला. कालावधी कमी असल्यामुळे आधी हा या मागण्या मान्य करा मग त्यावर कुणाला बोलायचे असेल तर बोलू द्या अशी भूमिका मांडली. सभापती यांनी सुद्धा असा पायंडा पडणार नाही असे सांगून सभागृहाची परवानगी घेवून या मागण्या मान्य झाल्या. त्यानंतर आमदार सुरेश धस (MLA Suresh Dhas) यांनी आपल्याला बोलण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. त्यांची मागणी मान्य होतच त्यांनी बोलायला सुरुवात केली. …मग मिरच्या का झोंबल्या? मुख्यमंत्र्यांचा रोखठोक सवाल संसदीय कामकाज मंत्री यांनी ही त्यांना बोलू द्यावे असे सांगितले म्हणून त्यांच्याशी बोलताना सुरेश धस यांनी माजी संसदीय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांची आठवण काढली. ते म्हणाले की, हर्षवर्धन पाटलांच्या काळात ते भडंग खाऊ घालायचे आणि आता मात्र नवीन मंत्री भडंग तर सोडाच पण मुंबईतील काही खास खाऊ घालत नाही. त्यावर सगळे सदस्यांनी शिव वाड्याची आठवण काढली आणि त्यावर धस यांनी तेही चालेल असे सांगितले. आपल्या नावाचा उल्लेख झाल्यामुळे अनिल परब यांनी उभे राहीले आणि यावर आपली भूमिका मांडली ते म्हणाले की, मीही तुम्हाला मुंबईचे काही खास पदार्थ खाऊ घालू इच्छितो, पण काय करणार आपल्याला एकदाही अधिवेशन जास्त काळ चालवता आलेला नाही. त्यामुळे ही संधी मिळाली नाही. पण मोठ अधिवेशन लावताच आपली आणि सदस्यांची मागणी पूर्ण करू, गरज पडली तर शेजारच्या जील्यातून बोटीने मागवू अस सेकपच्या आमदार जयंत पाटील यांच्याकडे पाहत असा आश्वासन त्यांनी दिले. त्यामुळे सभग्रहाचे वातावरण अगदीच निवळले आणि सभागृहात वड्या आणि भडंगचा विषय निघाल्याने वातावरण निवळले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात