मुंबई, 11 जुलै : शिवसेना आणि शिंदे गटाचा वादावर सर्वोच्च न्यायालयाने (supreme court) तुर्तास निर्णय जैसे थेच ठेवण्याचा निर्णय दिले आहे. ‘न्यायालयाने निर्णय दिला आहे, विधानसभा अध्यक्षांनी आमदारांसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये आता हा दिलासा नेमका कोणाला ? बेकायदेशीरपणे तयार झालेल्या सरकारला संरक्षण देण्याचे काम केले जात आहे’ अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार अरंविद सावंत (arvind sawant) यांनी दिली आहे. शिवसेनेनं शिंदे गटाच्या 16 आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र, न्यायालयाने आज तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे शिंदे गटाला दिलासा मानला जात आहे. या निर्णयावर शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिहिलेल्या संविधानवर घाव घालण्याचा जे काम होत आहे, याची मला चिंता वाटते. दोन तृतीयांश लोक पक्षातून बाहेर पडू शकत नाहीत तर त्यांचा वेगळा गट त्यांना प्रस्थापित करता येत नाही. कायद्याने तो गट मर्ज करायचा सांगितला आहे, असं सावंत म्हणाले. ‘न्यायालयाने असा निर्णय दिला आहे की, विधानसभा अध्यक्षांनी आमदारांसंदर्भात कोणताही निर्णय घेऊ नये आता हा दिलासा नेमका कोणाला ? बेकायदेशीरपणे तयार झालेल्या सरकारला संरक्षण देण्याचे काम केले जात आहे. आम्ही सर्वोच्च न्यायालयाकडे एकमेव आशा म्हणून पाहत आहोत. सरकार बेकायदेशीर असेल तर पुढे सुद्धा सर्व बेकायदेशीर चालेल, अशी टीकाही सावंत यांनी दिली. ‘जे लोक पक्षद्रोह करत आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आहे, पक्षाने याबद्दल निर्णय घेतला आहे, त्यानुसार कारवाई केली जाईल. त्याचा पूर्ण अधिकार हा पक्षाला आहे, असंही सावंत म्हणाले. ‘औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराचा निर्णय हा तिन्ही पक्षांनी मिळून घेतला आहे. शरद पवार यांनी नाराजी हा शब्द वापरला नाही मुख्यमंत्र्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आहे असे ते म्हणाले, असा खुलासाही सावंत यांनी केला. ‘14 जणांचा शिवसेना खासदारांचा ग्रुप आहे. त्या 14 जणांची नाव आम्हाला द्या ती जाहीर करा पक्षप्रमुखांचा समोर आमचे मत मांडायला आमचा अधिकार आहे कोणीही रोखलेले नाही. राष्ट्रपती निवडणुकीबाबत उद्धव ठाकरे यांनी स्वतः सांगितलं की मी सर्व खासदार आणि सोबत चर्चा करून निर्णय घेईल. आज दुपारी खासदारांची बैठक लावली आहे त्या बैठकीनंतर निर्णय होईल, अशी माहिती सावंत यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.