Home /News /mumbai /

"बंगाल, तमिळनाडू, केरळात भाजपचा पराभव झाला अन् मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले"

"बंगाल, तमिळनाडू, केरळात भाजपचा पराभव झाला अन् मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले"

Shiv Sena criticise BJP again in saamana editorial: शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

    मुंबई, 18 सप्टेंबर : भारतीय जनता पक्षांची (BJP) सत्ता असलेल्या राज्यांत गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या फेरबदलांवरुन शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या सामनातून (Shiv Sena mouthpiece Saamana) पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपतील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील मोदी यांना स्वत:चे हे बलस्थान माहीत असल्यानेच त्यांनी 2024 च्या निवडणुकांच्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केलीय. तीन राज्यांचे मुख्यमंत्री बदलले गेले. 'मोदी है तो मुमकीन है' मोदी हाच भाजपचा खरा चेहरा आहे आणि बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. 'मोदी है तो मुमकीन है' म्हणायचे ते इथे ! असं म्हणत शिवसेनेने निशाणा साधला आहे. भाजपची फजिती होईल याचा अंदाज गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे आंदोलन झाले तेव्हापासून हा समाज अस्वस्थ आहे. उद्याच्या विधानसभा निवडणुकीत या असंतोषाचा फटका बसेल आणि गुजरातमध्ये भाजपची फजिती होईल याचा अंदाज आल्यानेच आधी रुपाणी यांना त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह घरी पाठवले, पण नेतृत्वाची घडीच पूर्ण बदलून टाकताना पाटीदार समाजाचे नेते नितीन पटेल यांनाही मोडून काढले असंही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे. "...म्हणून त्यांनी मनातली भावना बोलून दाखवली" मुख्यमंत्र्यांच्या भावी सहकारी विधानावर फडणवीसांची प्रतिक्रिया मोदी-नड्डांवर स्वच्छता मोहीम घेण्याची वेळ सामनाच्या अग्रलेखात पुढे म्हटलं, नागरिकांमध्ये तसेच विरोधकांत मोदींच्या कार्यपद्धतीविषयी रोष दिसत असल्याने स्वत: मोदी किती जबाबदार आहेत तसेच त्यांच्या सोबतचे किती कारणीभूत आहेत हे समजून घेण्याची वेळ मोदी-नड्डांवर आली आहे. त्यातूनच गुजरातपासून उत्तराखंडपर्यंत स्वच्छता मोहीम त्यांना हाती घ्यावी लागली आहे. गेल्या काही महिन्यांत आसाम राज्य सोडले तर पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळात भारतीय जनता पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला. बंगालमध्ये तर अमित शहा यांनी जिवाची बाजी लावली होती. अमित शहा कोणताही चमत्कार घडवू शकतात अशी मोहीम राबवली गेली. पण अमित शहा यांच्याच काळात महाराष्ट्रात 25 वर्षे जुन्या शिवसेना-भाजप युतीचा तुकडा पडला आणि भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. बंगालमध्ये कपाळमोक्ष झाला. या सर्वांमुळेच जे. पी. नड्डा यांच्या माध्यमातून मोदींनी दुरुस्तीचे काम हाती घेतले असावे असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे. मोदी यांना स्वत:चे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी 2024 च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे. तीन राज्यांचे मुख्मयंत्री मोदी-नड्डा जोडीने बदलले. गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली. मध्यप्रदेश, हिमाचल, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांवर मोदी-नड्डा यांचे बारीक लक्ष आहे. मोदींनी गुजरातेत सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो असंही सामानाच्या अग्रलेखात म्हटलंय.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Shiv sena

    पुढील बातम्या