Home /News /mumbai /

एकनाथ शिंदेंच्या तावडीत असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचे कारण आले समोर, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर केले आरोप

एकनाथ शिंदेंच्या तावडीत असलेल्या शिवसेना आमदारांच्या नाराजीचे कारण आले समोर, कॉग्रेस आणि राष्ट्रवादीवर केले आरोप

आता भाजपसोबत जायचं की, दुसरा गट स्थापन करायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे घेणार आहे

आता भाजपसोबत जायचं की, दुसरा गट स्थापन करायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे घेणार आहे

आता भाजपसोबत जायचं की, दुसरा गट स्थापन करायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे घेणार आहे

    मुंबई, २२ जून: अडीच वर्ष सत्तेत असलेल्या शिवसेनेवर (shivsena) मोठे संकट उभा ठाकले आहे. शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे (shivsena leader eknath shinde) यांनी आमदारांना घेऊन बंड पुकारले आहे. पण, आता या आमदारांची नाराजीचे कारण आता समोर येत आहे. शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ (sanjay shirsatha) यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांनी आपल्याच पक्षाचे ३३ आमदार फोडून आधी सुरत आणि आता गुवाहाटी गाठले आहे. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात आमदार फुटल्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे. औरंगाबादमधील शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी आपली भूमिका मांडत राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर खापर फोडलेे आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत आम्ही ३५ आमदार आणि इतर अपक्ष आमदार सोबत आहोत. अजूनही आमदार गुवाहाटीमध्ये येत आहे. संध्याकाळपर्यंत हा आकडा ४० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. आमची नाराजी ही राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर आहे. नेतृत्वावर नाराजी अजिबात नाही. आता भाजपसोबत जायचं की, दुसरा गट स्थापन करायचा याचा निर्णय हे एकनाथ शिंदे घेणार आहे, असं संजय शिरसाठ म्हणाले. तसंच, मागील अडीच वर्षांमध्ये यावर बोलणार होतो, पण कोविड काळ गेला, त्यात मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळे आम्ही काही बोललो नाही,असंही शिरसाठ म्हणाले. तसंच, संजय राऊत यांनी शिवसेनेच्या आमदारांना मारहाण केल्याचा आरोप ेला आहे. पण कोणत्याही आमदाराला मारहाण झाली नाही. आमदारांना मारहाण कशी होऊ शकते. लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना कुणीही हात लावलेला नाही. संजय राऊत यांना ही माहिती कुठून मिळाली हे माहिती नाही, असंही शिरसाठ म्हणाले. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी न्यूज१८ लोकमतशी बोलत असताना आपली भूमिका मांडली. 'आम्ही शिवसेनेचे सदस्य मिळून एकूण ४६ आमदार एकत्र आहोत. आम्ही बाळासाहेबांचे सैनिक आहोत. त्यांची दिलेले हिंदुत्व पुढे नेणार आहोत. आमच्यासोबत ६ अपक्ष आमदार आहे आणि इतर सेनेचे आमदार आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जे काही सुरू आहे. त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहे' असं शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाले आहे, त्यामुळे आजच बंड का करावे वाटले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नाराज आमदारांबद्दल सांगितले नाही का, असं विचारला असता शिंदे म्हणाले की, 'अडीच वर्षांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांची नाराजी कळवली होती.त्यांनी आपण यावर चर्चा करून निर्णय घेऊ असं सांगितलं होतं' 'मी अद्याप कुठलाही निर्णय घेतला नाही. शिवसेना सोडलेली नाही. बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेतला नाही. जो काही निर्णय घ्यायचा आहे, तो आमदारांशी चर्चा करून घेणार आहे. भाजपसोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. जो काही निर्णय घ्यायचा असेल, तो आमदारांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहे'असं शिंदे म्हणाले. दरम्यान,शिंदे यांनी बहुसंख्य आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं बंडखोर आमदारांना मोठा इशारा दिला आहे. शिवसेना आमदारांची तातडीची बैठक आज संध्याकाळी (बुधवार) वर्षा बंगल्यावर आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला उपस्थिती आवश्यक असल्याचा आदेश पक्षानं या आमदारांना दिला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या