जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / संजय राठोड आजच राजीनामा देण्याची शक्यता, राऊतांचेही सूचक ट्वीट

संजय राठोड आजच राजीनामा देण्याची शक्यता, राऊतांचेही सूचक ट्वीट

संजय राठोड आजच राजीनामा देण्याची शक्यता, राऊतांचेही सूचक ट्वीट

विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरू नये यासाठी शिवसेनेकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 28 फेब्रुवारी : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळेच  राज्य विधिमंडळाच्या अधिवेशन पूर्वसंध्येला वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही याबद्दल सूचक ट्वीट केले आहे. राज्य सरकारच्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. परंतु, अधिवेशनात सरकारची प्रतिमा मलिन होऊन नये, विरोधकांनी या मुद्यावरून सरकारला घेरू नये यासाठी शिवसेनेकडून संजय राठोड यांचा राजीनामा घेतला जाणार असल्याची शक्यता आहे. आज चहापानापूर्वी महा आघाडीची बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारच्या प्रतिमेवर चर्चा होणार आहे. संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. पण शिवसेनेच्या काही मंत्री, आमदारांनी संजय राठोड यांची पाठराखण केली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सुद्धा आरोप झाले होते. पण, त्यानंतर महिलेनं तक्रार मागे घेतली होती. पण आरोपच काय? असा सवालही सेनेच्या नेत्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक फोटो ट्वीट करून संजय राठोड यांच्यावर कारवाई होणार असे संकेत दिले आहे.

जाहिरात

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हातात राजदंड असलेला फोटो राऊत यांनी ट्वीट केला आहे. ‘शिवरायांच्या हातातला हा राजदंड काय सांगतो? महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन!’ असा मजकूर या फोटोवर लिहिलेला आहे. त्यामुळे संजय राठोड यांच्या राजीनामाच्या चर्चेला उधाण आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात