मुंबई, 10 जून : राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीची धामधूम होती. महाविकास आघाडीने बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव देवूनही भाजपने तो प्रस्ताव धुडकावला होता. त्यामुळे तब्बल दोन दशकांनी ही निवडणूक झाली. या सहा जागांच्या निवडणुकीत भाजपने सातवा उमेदवार उतरवल्याने महाविकास आघाडीची (विशेषत: शिवसेनेची) धाकधूक वाढली होती. ही लढत खरंच अटीतटीचीच ठरली. कारण शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं दुर्देवाने निधन झाल्याने त्यांचं मत शिवसेनेला मिळू शकलं नाही. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत असल्याने कोर्टाने त्यांना मतदानासाठी परवानगी नाकारली होती. पण या संकट काळात शिवसेनेला शत्रूपक्ष असलेला एमआयएम पक्षाने साथ दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त करणाऱ्या समाजवादी पक्षाने देखील शिवसेनेला साथ दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे सहावा जागेचे उमेदवार संजय पवार यांचा विजय निश्चित मानला जातोय. शिवसेनेच्या संजय पवारांना कोणत्या पक्षाचे किती मतं? काँग्रेस - २ राष्ट्रवादी - ९ + ३ अपक्ष शिवसेना - ११ अपक्ष आमदार आशिष जैस्वाल किशोर जोरगेवर गीता जैन मंजुळा गावित नरेंद्र भोंडेकर चंद्रकांत पाटील विनोद निकोले विनोद अग्रवाल राजेंद्र याद्रावकर शंकरराव गडाख बच्चू कडू राजकुमार पटेल अबू आझमी रईस शेख मुफ्ती महंमद इस्माईल फारुख शह एकूण पहिल्या पसंतीची 41 मतं राज्यसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल https://lokmat.news18.com/rajya-sabha-election-2022/ या वेबसाईटवर वाचा राज्यसभेच्या सहा जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली. पण सहाव्या जागेसाठी ही लढत जास्त महत्त्वाची ठरली आहे. कारण सहाव्या जागेसाठी शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात ही अटीतटीची लढत राहिली. या निवडणुकीत पहिल्या पसंतीत ज्या उमेदवाराला 41 मतं मिळतील त्या उमेदवाराचा विजय निश्चित मानला जाईल. पहिल्या पसंतीची मते ही 41 पेक्षाही कमी असली तर साहजिकच दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातील. दुसऱ्या पसंतीचे मुल्य हे पहिल्या पसंतीच्या मुल्यांवर अवलंबून आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.