तुषार रूपनवर, प्रतिनिधी मुंबई, 15 जून: शिवसेना (Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांच्यात मुख्यमंत्रिपद, सत्तास्थापनेवरुन झालेल्या मतभेदानंतर दोन्ही पक्षांची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने विरोधात असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसोबत हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. मात्र, आता मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्यांनी मुख्यमंत्रिपदाची (Chief Minister Post) इच्छा व्यक्त केली आहे. यासोबतच महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi Government) वादही अनेकदा चव्हाट्यावर आले आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही झाली होती. त्यामुळे आगामी 2024च्या निवडणुकीत पुन्हा शिवसेना-भाजपची युती पहायला मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. याच संदर्भात आता रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी भाष्य केलं आहे. पुन्हा शिवसेना-भाजप युती होणार? केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना प्रश्न विचारण्यात आला की, येत्या काळात शिवसेना-भाजप हे समीकरण जुळून पुन्हा युती होणार का? या प्रश्नावर रावसाहेब दानवे यांनी म्हटलं, “2024ची लोकसभा आणि विधानसभा निवडणूक भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढवणार”. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आता येत्या काळात शिवसेना-भाजपची युती होण्यची शक्यता तरी कमी दिसत आहे. नाना पटोलेंना मुख्यमंत्री व्हायचंय! राजकारणात वादळ येणार की केवळ चर्चांना उधाण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया देताना रावसाहेब दानवे म्हणाले, राजकीय मतभेद आहेत मनभेद नाही म्हणून पंतप्रधान यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच स्वागत केल. दोघांमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. तिन्ही पक्षातील नेत्यांना मुख्यमंत्री करावं नाना पटोले यांना देखील मुख्यमंत्री केल पाहीजे. त्यांनी ज्याप्रकारे इच्छा व्यक्त केली आहे. मात्र आमची इच्छा आहे की, महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे तीन मुख्यमंत्री येत्या काळात झाले पाहीजे. कारण 2024 नंतर भाजपाची सत्ता असेल असंही रावसाहेब दानवेंनी म्हटलं आहे. नारायण राणेंना केंद्रात पद? नारायण राणे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगल काम केल आहे. मात्र त्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यासंदर्भात निर्णय आमचे दिल्लीतील नेते घेतील अशी प्रतिक्रिया रावसाहेब दानवेंनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.