Home /News /mumbai /

ज्योतिष्यानेच सांगितलं शिंदे सरकार कधी पडणार? जयंत पाटलांनी सांगितला महिना

ज्योतिष्यानेच सांगितलं शिंदे सरकार कधी पडणार? जयंत पाटलांनी सांगितला महिना

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर हे वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर हे वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर हे वक्तव्य पाटील यांनी केलं आहे.

    मुंबई, ०५ जुलै : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Government) स्थापन झाल्यानंतर हे सरकार किती दिवस टिकणार याची चर्चा रंगली आहे. पण आता शिंदे सरकार पाडण्यासाठी भविष्यवाणीचाही आधार घेतला जात असल्याचे समोर आले आहे. खुद्ध राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) हे सरकार सहा महिन्यात पडेल असं एका ज्योतिष्याने सांगितले आहे, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटलांनी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच सांगितले. शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. बंडखोर आमदार आणि भाजपच्या १०६ आमदारांसोबत सरकार स्थापन झाले आहे. अजूनही या सरकारचा खातेवाटप बाकी आहे. पण, त्याआधीच हे सरकार सहा महिन्यात कोसळले जाणार असे भाकित वर्तवले जात आहे. राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबद्दल भविष्यवाणीची सांगितली. सहा महिन्यात शिंदे आणि फडणवीस सरकार पडणार आहे, असं आपल्याला एका ज्योतिषीने सांगितले आहे असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर हे वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. मात्र शरद पवार यांनी आपला ज्योतिष्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे. (अकरावीच्या प्रवेशासाठी अजून थोडी वाट बघावी लागणार; मोठं कारण आलं समोर) विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची वाय बी चव्हाण सेंटर येथे महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह सर्व दिग्गज नेते आणि पक्षाचे सर्व आमदार उपस्थित होते. या बैठकीत शरद पवार यांनी आपल्या आमदारांना महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. यापैकी सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे, हे सरकार सहा महिनेच टिकेल. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांसाठी तयार राहा, अशी सूचना शरद पवारांनी आमदारांना दिली. "महाराष्ट्रातील नवं सरकार, शिंदे सरकार जास्त काळ टिकू शकणार नाही. सरकार पाच ते सहा महिने टिकेल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तयार राहा. आपण राष्ट्रवादी काँग्रेस सध्या विरोधी बाकावर बसणार असलो तरी मतदारसंघात जास्तीत जास्त वेळ द्या", अशी महत्त्वाची सूचना पवारांनी आपल्या आमदारांना केली. शरद पवार यांच्या दाव्यानुसार ज्या आमदारांना मंत्रिपदाची महत्त्वकांक्षा आहे आणि त्यांना मंत्रिपद मिळालं नाही तर पुन्हा ते काही दिवसांत स्वगृही परतण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेलं सरकार पुढच्या काही महिन्यांमध्ये सहज कोसळण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या