मुंबई, 20 डिसेंबर: अश्लील चित्रपट निर्मिती केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि बिझनेसमन राज कुंद्रा यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी राज कुंद्रा यांना न्यायालयाने जामीन दिला आहे. जामीन मिळाल्यानंतर देखील राज कुंद्रा यांनी अश्लील चित्रपट निर्मितीबाबत मौन बाळगलं होतं. पण अखेर राज कुंद्रा यांनी एक निवेदन जारी करत आपलं मौन सोडलं आहे. घडलेल्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसून आयुष्यात आपण कधीही पॉर्नोग्राफी निर्मितीमध्ये किंवा वितरणात सहभागी झालो नसल्याचं राज यांनी निवेदनात म्हटलं आहे. घडलेला सर्व प्रकार मला बदनाम करण्याचा एक कट होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने मी यावर अधिक बोलू इच्छित नाहीये. संबंधित खटल्यातील सुनावणीला मी सामोरं जाणार असून याठिकाणी मला न्याय मिळेल, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्णपणे विश्वास आहे. न्यायालयात सत्याचा विजय होईल. पण दुर्दैवाची बाब म्हणजे माध्यमांनी आणि माझ्या कुटुंबाने मला आधीच दोषी ठरवलं आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून मला विविध प्रकारचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हेही वाचा- Raj Kundra नव्या अॅपसाठी करणार होता ‘या’ मराठी अभिनेत्रीची निवड; नाव ऐकून बसेल धक्का विविध स्तरावर माझ्या मानवी आणि घटनात्मक अधिकारांचं उल्लंघन केलं जात आहे. ट्रोलिंग आणि नकारात्मकता पसरवून माझ्याबद्दल समाजात द्वेष पसरवला जात आहे. पण येथून पुढे माध्यमांकडून सुरू असलेलं मीडिया ट्रायल बंद करावं. आणि माझ्या गोपनीयतेच्या अधिकाराचं उल्लंघन होऊ नये, अशी आशा आहे. हेही वाचा- Raj Kundra Bail:राज कुंद्रा 64 दिवसांनी जेलमधून बाहेर; शिल्पा शेट्टीने पोस्ट करत म्हटलं… माझं कुटुंब माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला इतर सर्व गोष्टी माझ्यासाठी गौण आहेत. मला विश्वास आहे की, घटनेनं प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे माझा हा अधिकार अबाधित राहावा, अशी इच्छा आहे. असंही राज कुंद्रा यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.