Home /News /mumbai /

राहुल गांधींवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, राष्ट्रीय नेत्याच्या रुपात 'या' गोष्टीची कमतरता

राहुल गांधींवर शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, राष्ट्रीय नेत्याच्या रुपात 'या' गोष्टीची कमतरता

यावेळी त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या टीकेचाही उल्लेख केला आहे

    मुंबई, 4 डिसेंबर : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे (NCP) प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्याबाबतीत मोठं वक्तव्य केलं आहे. पवार म्हणाले की, राहुल गांधी यांच्यामध्ये एक राष्ट्रीय नेत्याच्या स्वरुपात काही प्रमाणात सातत्याची कमतरता दिसून येत आहे. यावेळी त्यांनी राहूल गांधींवर बराक ओबामा यांनी केलेल्या टीकेवर आक्षेप घेतला. ओबामा यांच्या टिप्पणीवर आक्षेप मीडियाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या सातत्याबाबत वक्तव्य केलं. मात्र त्याचवेळी अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या टिप्पणीवर कडक आक्षेप घेतला. ओबामांनी अलीकडेच आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, राहुल गांधी एखाद्या शिक्षकाला प्रभावित करण्यासाठी उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यासारखे दिसतात. ज्याच्याकडे कोणत्याही विषयात प्राविण्य मिळवण्याची योग्यता आणि उत्कटता नाही. बराक ओबामा यांच्या टीकेवर शरद पवार म्हणाले की, 'मी माझ्या देशाच्या नेतृत्वाबद्दल काहीही बोलू शकतो, परंतु मी दुसर्‍या देशाच्या नेतृत्वाबद्दल बोलणार नाही. एखाद्याने ती मर्यादा पाळायला हवी. मला वाटते राहुल गांधींविषयी वक्तव्य करुन ओबामा यांनी ती मर्यादा ओलांडली आहे. कॉंग्रेस आणि राहुल यांच्याबद्दल पवार म्हणाले... मुलाखतीत शरद पवारांना जेव्हा विचारण्यात आलं की, राहुल गांधी यांना देशातील नागरिक नेता म्हणून मानण्यास तयार आहे का? यावर पवार म्हणाले की, या संदर्भात काही प्रश्न आहेत. त्यांच्यात सातत्य नसल्याचे दिसते. त्याचवेळी राहुल गांधींना कॉंग्रेससाठी अडथळा ठरत आहे का असे विचारले असता ते स्पष्ट शब्दांत म्हणाले की कोणत्याही पक्षाचे नेतृत्व संघटनेत कसे स्वीकारले जाते यावर अवलंबून असते.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Rahul gandh, Rahul gandhi, Sharad pawar

    पुढील बातम्या