मुंबई, 14 जुलै : शिवसेनेमध्ये आमदारांच्या बंडखोरीनंतर मोठी खासदारांनीही बंडाचे हत्यार उपसले होते. त्यामुळे शिवसेनेनं राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत (presidential election 2022) एनडीएच्या (nda) उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला. पण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackery) यांच्या या निर्णयावर काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादीनेही (ncp) नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मुर्मू (draupadi murmu) यांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेना खासदारांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंनी हा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, सर्व खासदारांनी एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी मागणी केली होती. अखेरीस आमदारांच्या दबावापुढे उद्धव ठाकरेंना हा निर्णय घ्यावा लागला. मात्र, या निर्णयामुळे महाविकास आघाडीमध्ये वाद पेटला आहे. एनडीएच्या उमेदवाराला शिवसेनेच्या पाठिंब्याने राष्ट्रवादीने नाराज व्यक्त केली आहे. भाजपच्या राष्ट्रपतीच्या उमेदवारला पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादी काँगेस पक्षात नाराजी आहे. यूपीएच्या उमेदवाराला पाठिंबा न दिल्याने राष्ट्रवादीमध्ये शिवसेनेविषयी नाराजी वर्तवली जात आहे. यशवंत सिन्हा यांना शिवसेना पाठिंबा न दिल्याने महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नाराजी व्यक्त केली आहे. ( ‘मराठी इंडस्ट्रीत तुला…’ निळू फुलेंचं भाकीत खरं ठरलं,किरण मानेंची पोस्ट चर्चेत ) दरम्यान, शिवसेनेच्या निर्णयामुळे काँग्रेसने सुद्धा नाराजी व्यक्त केली. शिवसेना महाविकास आघाडीत आहे, पण राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला निर्णय घेताना त्यांनी आमच्याशी काहीही चर्चा केलेली नाही, अशी खंत काँग्रेस नेते आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली. गैरलोकशाही मार्गाचा अवलंब करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडले गेले, शिवसेनेच्या अस्तित्वाला आव्हान दिले गेले, अशा परिस्थितीत शिवसेनेने घेतलेली भूमिका अनाकलनीय आहे, असं मतही थोरातांनी व्यक्त केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.