• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • Sex Racket busted: ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक

Sex Racket busted: ठाण्यात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोन अभिनेत्रींना अटक

Sex Racket busted in Thane: ठाणे क्राईम ब्रांचने मोठी कारवाई करत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन अभिनेत्रींना अटक करण्यात आली आहे.

  • Share this:
ठाणे, 2 जून : ठाण्यात एका हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश (High Profile sex racket busted) करण्यात आला आहे. धक्कादायक म्हणजे या कारवाईत ठाणे क्राईम ब्रांच (Thane Crime Branch)ने दोन अभिनेत्रींना अटक (2 Actress arrested) केली आहे. एका खाजगी सोसायटीतील हे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं. ठाणे क्राईम ब्रांचला याची माहिती मिळताच धाड टाकून ही कारवाई केली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील पाचपाखाडी येथील एका खाजगी सोसायटीमध्ये या दोन्ही अभिनेत्री सेक्स रॅकेट चालवत होत्या मुंबईतील एका मोठ्या सेक्स रॅकेट एजंटच्या संपर्कात या दोन्ही अभिनेत्री होत्या याच एजंटच्या माध्यमातून या दोन्ही अभिनेत्री ठाण्यात वेश्याव्यवसाय करता आल्या होत्या वेश्या व्यवसाय करता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घेत होत्या यावरून असं लक्षात येते की यांना मागणी करणारे देखील श्रीमंत व्यक्ती आहेत ज्यांचा शोध देखील ठाणे क्राइम ब्रांच करत आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या दोन्ही अभिनेत्रींनी तामिळ सिनेमात लीड रोल केला असून बॉलिवूडच्या काही सिनेमात साईड रोल आणि सीरिअलमध्ये मुख्य रोल या दोन्ही अभिनेत्रींनी केले आहेत सध्या covid-19 मुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण देखील बंद आहे अशातच आपले महागडी हौस पुरवण्यासाठी या अभिनेत्री वेश्याव्यवसायाकडे वळाल्या आहेत अशा माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील ग्रांट रोडमध्ये हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, 2 मॉडेल्सची सुटका वेश्या व्यवसायातून लाखो रुपये कमवून आपल्या गरजा पूर्ण करण्याकरता हे सगळं केलं जात होतं याकरता फक्त या दोन अभिनेत्रीच नाही तर आणखीन बऱ्याच अभिनेत्री आहेत. ज्या वेश्या व्यवसाय करतात या दोघींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार बॉलिवूडमधील तसंच टॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री मुंबई आणि ठाण्याच्या वेश्या व्यवसाय एजंटच्या संपर्कात आहेत. अनेक एक हाय प्रोफाईल त्याचपद्धतीने श्रीमंत व्यक्तींकडून या अभिनेत्रींची वेश्या व्यवसाय करता मागणी केली जाते त्यामुळे ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट वन केलेल्या कारवाईची लिंक ही फक्त ठाणे मुंबई पुरतीच सिमित नसून इतर राज्यात देखील असल्याचे बोलले जात आहे त्यानुसार ठाणे क्राईम ब्रांच युनिट एक तपास करत आहे. ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच युनिट 1 ने एक मोठी कारवाई करत दोन अभिनेत्रींना अटक केली आहे. ज्या एका खाजगी सोसायटीत हे सेक्स रॅकेट चालवायच्या. बॉलिवूडशी संबंधीत या दोन्ही अभिनेत्री असून वेश्या व्यवसायाकरता या दोन्ही अभिनेत्री लाखो रुपये घ्यायच्या अशी माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे. तर कोविड 19 च्या काळात चित्रिकरण बंद असल्याने या दोन्ही अभिनेत्री वेश्या व्यवसायाकडे वळाल्या असं देखील तसापात समोर आल आहे. धक्कादायक म्हणजे या सेक्स रॅकेटचीं लिंक मुंबईतील अनेक मोठ्या अभिनेत्रींशी असल्याचे बोलले जात आहे. एका सोसायटीत हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं आणि त्यामध्ये दोन अभिनेत्रींचा समावेश असल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आता ठाणे क्राईम ब्रांच अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी करत आहेत. हे एक मोठं रॅकेट असल्याची पोलिसांना शंका आहे.
Published by:Sunil Desale
First published: