मुंबई, 07 नोव्हेंबर : आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर शेअर मार्केटमध्ये ‘अच्छे दिन’ पाहण्यास मिळाले. आज विशेष मुहूर्तावर शेअर बाजारात ३१० अंकांनी उसळी मारून ३५ हजार अंकांच्या पार झाला आहे. नॅशनल स्टाॅक एक्सचेंज निफ्टीमध्येही तेजी पाहण्यास मिळाली. निफ्टीची सुरुवात ६१ अंकांवरून मजबूत होऊन १०,५९१ अंकावर पोहोचला. सेंसेक्स २४५.७७ तर निफ्टी 68.४० अंकांवर बंद झाला. आजच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर जवळपास एकातासात गुंतवणूक करणाऱ्यांना १.१८ लाख कोटींचा फायदा झाला. लक्ष्मीपूजचनाच्या मुहूर्तावर आज संध्याकाळी ५.३० ते ६.३० पर्यंत सुरू होता. आता शेअर बाजार गुरुवारपर्यंत बंद राहणार आहे. शेअर बाजार सुरू झाल्यानंतर काही मिनिटांमध्ये सेंसेक्स ३१० अंकांनी वाढून 35,301.91 अंकावर पोहोचला. मंगलवारी हाच आकडा 41 अंकांनी मजबूत होता. मुंबईच्या शेअर बाजारात (BSE) मध्ये सर्वच उद्योजकांची आगेकूच होती.
Mumbai: #Mahurattrading begins at Bombay Stock Exchange (BSE), actor Neetu Chandra present. pic.twitter.com/oBJMouIn6Q
— ANI (@ANI) November 7, 2018
आंतरराष्ट्रीय स्तरावर आशियाई बाजारात हाँगकाँगमध्ये 0.10 टक्के तर तायवान शेअर बाजारात 0.85 टक्के वाढ झाली. परंतु, जपानमध्ये निक्की ०८८ अंकांनी कोसळला. दिवाळीसोबत नव्या वर्षांची सुरुवात होत असते. भारतीय परंपरेनुसार भारतातील अनेक भागात दिवाळीसह नव्या वर्षाची सुरुवात झाली आहे. या शूभ मुहूर्तावर शेअऱ बाजारात विशेष ट्रेडिंग केलं जात असतं. ===========================