Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज?

उद्धव ठाकरेंची डोकेदुखी वाढणार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाराज?

अशोक चव्हाण यांच्या खात्यातील काही विभागाचे विभाजनाचा प्रस्ताव त्यांना न विचारता मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू आहे.

मुंबई, 24 जुलै : 'मी इथंच बसलोय माझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडून दाखवा', असं चॅलेंज एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भाजपला देत आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचं समोर आलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केले आहे. ठाकरे सरकारमध्ये निर्णय घेण्यावरून याआधीही वाद झाला होता. आता पुन्हा एकदा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नाराजी व्यक्त केली आहे.  सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज असल्याचे समोर आले आहे. अशोक चव्हाण यांच्या  खात्याच्या काही विभागाचे  विभाजनाचा प्रस्ताव त्यांना न विचारता मंजुरी देण्याच्या हालचाली सुरू आहे. त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं समजत आहे. याबद्दल अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली, असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  त्यांच्या विभागातील काही अधिकारी हे परस्पर प्रस्ताव देत असल्याने अशोक चव्हाण कमालीचे नाराज झाले आहे. यापूर्वीही चव्हाण यांना हवे ते सचिव न दिल्याने  नाराजी होती. त्यात आता अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराने भर घातली आहे. अशोक चव्हाण का नाराज? एकनाथ शिंदे मंत्री असलेले सार्वजनिक बांधकाम उपक्रमे विभागास नवीन वेगळा सचिव तसंच इतर अधिकारी वर्ग द्यावा अशी मागणी आणि त्यात वेगळा स्टाफ देण्यास हरकत असल्याचे म्हटले जाते. सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सार्वाजनिक बांधकाम उपक्रम दोन विभागाचे एक सचिव सध्या आहेत. वेगळा सचिव देण्यास हरकत नाही पण सध्या सार्वाजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सर्व कर्मचारी वर्ग आहे, तो वेगळा करण्सास हरकत आहे. नेमक्या या मुद्द्यामुळे चव्हाण नाराज असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या निर्णयात सहभागी करून घेतले जात नाही, अशी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. दिवसभर चाललेल्या या बैठकीनंतर बाळासाहेब थोरात यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीमध्ये असा कोणताही वाद नाही, असं स्पष्ट केले होते. पण, आता अशोक चव्हाण पुन्हा एकदा नाराज असल्याचे समोर आल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: अशोक चव्हाण, उद्धव ठाकरे, काँग्रेस

पुढील बातम्या