जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / "जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते", याचिका फेटाळत परमबीर सिंहांना SCनं सुनावलं

"जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते", याचिका फेटाळत परमबीर सिंहांना SCनं सुनावलं

"जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते", याचिका फेटाळत परमबीर सिंहांना SCनं सुनावलं

सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली (Supreme Court Refuses Param Bir Singh’s plea) आहे. महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी परमबीर सिंह यांनी केली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली 11 जून : सर्वोच्च न्यायालयाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली (Supreme Court Refuses Param Bir Singh’s plea) आहे. महाराष्ट्राबाहेरील स्वतंत्र यंत्रणानी त्यांच्या विरोधीत प्रकरणांची चौकशी करावी, अशी मागणी परमबीर सिंह यांनी केली होती. सुनावणीवेळी न्यायालयानं म्हटलं, की तुम्ही 30 वर्षे पोलीस दलात काम करत आहात. मात्र आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहात. तुम्ही महाराष्ट्र केडरचा भाग आहात, तरीही तुम्हाला तुमच्या राज्यावर किंवा तिथल्या प्रशासनाच्या चौकशीवर विश्वास नाही का? न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी या प्रकरणी सुनावणी करताना “जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते” असे ताशेरे परमबीर सिंह यांच्यावर ओढले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आपल्यामागे चौकशीचं शुल्ककाष्ट लावल्याचा दावा परमबीर सिंह यांनी केला. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वी.रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे.

जाहिरात

बंगालमध्ये मोदींचा विजयरथ रोखणारे रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला सर्वोच्च न्यायालयानं परमबीर सिंह यांची याचिका फेटाळताना म्हटलं की, “तुम्ही महाराष्ट्र केडरचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी आहात. सुमारे 30 वर्षे तुम्ही महाराष्ट्र केडरमध्ये सेवा केली आहे. तरीही तुम्ही राज्य सरकारच्या आणि पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचं आता सांगत आहात? हे अतिशय धक्कादायक आहे”. यावेळी बोलताना सिंह यांचे वकील महेश जेठमलानी यांनाही न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी सुनावलं. ते म्हणाले, पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाब टाकला जात असेल तर कोणत्याही दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाब टाकला जाऊ शकतो. विनाकारण काहीही गोष्टी सांगू नका.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात