मुंबई : तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल आणि FD करण्याचा तुमचा विचार असेल तर थोडं थांबा. SBI ग्राहकांना नव्या वर्षात खूप मोठं गिफ्ट देणार आहे. SBI ग्राहकांना नव्या वर्षात FD वर चांगला व्याजदर मिळणार आहे. त्यामुळे नव्या वर्षात तुम्ही FD करून जास्त पैसे कमवू शकता. जर तुम्ही एसबीआयमध्ये एफडी केली असेल किंवा करणार असाल तर ते तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. कारण एसबीआयने डिपॉझिटचे दर वाढवले आहेत. बँकेने रिटेल टर्म डिपॉझिटच्या दरात 0.65 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. रिटेल टर्म डिपॉझिटचे दर अर्थात एफडीचे दर 0.15-0.65 टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचबरोबर बल्क टर्म डिपॉझिटचे दर 0.50% वरून 1% पर्यंत वाढले आहेत. 211 दिवस ते 10 वर्षांच्या ठेवींवरील दर वाढविण्यात आले आहेत.
इथे चेक करा SBI च्या FD चे दर 7 ते 45 दिवसांसाठी रेट वाढवून आता 3 टक्क्यांवरून 3.50 टक्क्यांवर करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 3.50 टक्के असणार आहे. 46 दिवस ते 179 दिवसांचे एफडी दर 4 टक्क्यांवरून 4.50 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही दर 5 टक्के करण्यात आला आहे. 180 दिवस ते 210 दिवसांचे एफडी दर 5.25 टक्के आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीही हे दर 5.75 टक्के कायम आहेत. 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी एफडी दर 5.50 टक्क्यांवरून 5.75 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठीचे दरही 6 टक्क्यांवरून 6.25 टक्के झाले आहेत.
2 वर्षे आणि 3 वर्षांपेक्षा कमी FD ठेवणाऱ्यांना आता 6.75 टक्के व्याजदर मिळणार आहे. तर जेष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर लागू होणार आहे. 3 ते 5 वर्षांपर्यंत FD ठेवणाऱ्यांना 6.10 टक्क्यांवरून व्याजदर वाढून 6.25 टक्के व्याजदर मिळणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना 6.75 टक्के व्याजदर वाढणार आहे.