मुंबई, 26 सप्टेंबर : शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज पुण्यात शिवसेनेच्या मेळाव्यातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. पण, संजय राऊत हे पार गोंधळून गेले आहे. त्यामुळेच राष्ट्रवादीने (ncp) जर साथ दिली नाहीतर भाजपसोबत जाऊ शकतो, असे संकेतच त्यांनी दिले आहे. पण नेमकं करायचं काय, हेच त्यांना कळत नाहीये' असा पलटवार भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (praveen darekar) यांनी केला आहे.
आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा बैठकीला हजेरी लावली. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहे. पुण्यातील शिवसेनेच्या मेळाव्यातून संजय राऊत यांनी मात्र, सरकार पाच वर्ष टिकेल, असं म्हणाले आहे. यावर प्रतिक्रिया देत प्रवीण दरेकर यांनी सेनेला टोला लगावला आहे.
संजय राऊत यांची विधानं ही भरकटलेली आणि गोंधळात असणारी आहे. आमचं ऐकणार नाही. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला गेले आहे. असा इशारा राऊत यांनी राष्ट्रवादीला दिला आहे. तसंच आपल्या नेत्यांना राष्ट्रवादीसोबत जुळवून घ्यायचं असंही सांगायचं. म्हणजे, तुम्ही जर साथ दिली नाहीतर भाजपसोबत जाऊ शकतो, असे संकेतच राऊत यांनी दिले आहे. म्हणजे नेमकं करायचं काय,याचा कोणताही बोध होत नाही. शिवसेनेमध्ये राष्ट्रवादीबद्दल संतापाचं वातावरण आहे. ते आज राऊत यांना पुण्यात दिसून आला आहे. त्यामुळे ते असं बोलले, असं दरेकर म्हणाले.
संजय राउत यांनी थेट पिपरी चिंचवड इथे जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आव्हान दिले आहे. आमचं ऐका नाही तर मुख्यमंत्री आज दिल्लीत गेले असं सांगून संजय राऊत यांनी राष्ट्रवादीच्या इशारा दिला आहे, असा दावाही दरेकरांनी केला आहे.
तसंच, ठाकरे सरकारनेच सत्तेचा गैरवापर करत नारायण राणे यांना अटक केल्याचे उघड होत आहे. तसंच, राऊत सभेत बोलले आहे. यावरूनच सत्तेचा गैरवापर कस करतात हे लोकांसमोर उघड झाले आहे, असंही दरेकर म्हणाले
भाजपचे आमदार सुनील कांबळे यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. पण, त्यांनी याबाबत त्यांचा आवाज नाही असं सांगितलं आहे. कांबळे यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. त्याचा तपास झाल्यानंतर सत्य ते बाहेर येईल. पण लगेच टिका टिप्पणी करू नये, राज्यातील सत्ताधारी अर्धवट माहितीवर आरोप करत आहे, त्यांनी थोडं सबुरीने घ्यावं, असंही दरेकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pravin darekar