Home /News /mumbai /

'काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड', संजय राऊतांची जळजळीत टीका

'काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड', संजय राऊतांची जळजळीत टीका

फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते. आता राज्यात काय होणार?

फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते. आता राज्यात काय होणार?

फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते. आता राज्यात काय होणार?

    मुंबई, 03 जुलै :  एकनाथ शिंदे (eknath shinde) मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांना उपमुख्यमंत्रिपद स्वीकारावे लागले हाच खरा भूकंप आहे. फडणवीस पुन्हा आले, पण ते असे ‘अर्धवट’ येतील असे कुणालाच वाटले नव्हते. आता राज्यात काय होणार? असा सवाल उपस्थितीत करत शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी फडणवीस यांना पुन्हा एकदा डिवचले. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी पुकारून भाजपसोबत आता सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना पुरती घायाळ झाली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या सामनाच्या रोखठोक सदरातून (Sanjay raut saamana rokhthok) संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रात भूकंप झाला व असा भूकंप राजकारणात कधी झालाच नव्हता असे वर्णन एकनाथ शिंदेंच्या बंडाबाबत झाले, पण त्या बंडापेक्षा मोठा भूकंप नऊ दिवसांनी झाला. शिंदे यांच्या बंडामागचे चाणक्य म्हणून संपूर्ण मीडिया देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देत होता, पण सत्य वेगळेच होते. हे बंड थेट दिल्लीच्या सूत्रधारांनी घडवले व महाराष्ट्रातील भाजप त्याबाबत पूर्ण अंधारात होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील असे जे बोलत होते ते नंतर कोसळले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले व देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री व्हावे असे फर्मान भाजप हायकमांडने सोडले. हाच खरा भूकंप आहे. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची झेप फडणवीस यांच्या दिल्लीतील नेत्यांनी रोखली व शिंदे यांना बळ दिले. फडणवीस यांच्यासाठी हा धक्का आहे. महाराष्ट्र भाजपचे एकतर्फी नेतृत्व फडणवीस यांच्या हाती होते, पण अमित शहा व फडणवीसांत सख्य नव्हते. ‘‘मला उपमुख्यमंत्रिपद नको. चंद्रकांत पाटील यांना ते द्या. मला भाजप प्रदेशाध्यक्ष करा’’, अशी त्यांची विनंती शेवटच्या क्षणी फेटाळण्यात आली, असा दावाही राऊत यांनी केला. 'कधी काळी आपलाच ज्युनियर मंत्री असलेल्या शिंदे यांच्या हाताखाली काम करण्याची वेळ फडणवीस यांच्यावर आली. हे त्यांच्या कर्माचे फळ आहे. 2019 मध्ये सत्तेचा 50-50 टक्के फॉर्म्युला त्यांनी स्वीकारला नाही व महाविकास आघाडीचे सरकार त्यामुळे निर्माण झाले. उद्धव ठाकरे हे अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले व आता बंडखोर शिवसैनिक शिंदे यांना हे पद भाजप हायकमांडने दिले. काळाने फडणवीसांवर घेतलेला हा सूड आहे, अशी टीकाही राऊतांनी केली. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी पुकारून भाजपसोबत आता सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे शिवसेना पुरती घायाळ झाली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून संजय राऊत यांनी शिंदे सरकार आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. 'महाविकास आघाडीचे सरकार अडीच वर्षांतच कोसळले, ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमुळे नाही. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देताना सांगितले, ‘‘माझ्याच लोकांनी दगा दिला.’’ चाळीस आमदारांपैकी काहींनी आधी शिवसेनेचा राज्यसभेचा उमेदवार पाडला व याच गटाने भारतीय जनता पक्षाचा पाचवा उमेदवार विधान परिषदेत विजयी केला. दगाबाजीची ही बीजे रोवली जात असताना मुख्यमंत्री याच लोकांवर कुटुंबाचे घटक म्हणून विश्वास ठेवून होते. एका महानाट्यात छत्रपती शिवरायांच्या तोंडी एक ज्वलंत वाक्य आहे. छत्रपती सांगतात, ‘‘शत्रूची फौज कधीच मोजू नका. आपल्यातील फितूर किती ते मोजा!’’ अशा शब्दांत राऊत यांनी शिंदेंवर केली.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Maharashtra News

    पुढील बातम्या